गुन्हे शाखा यूनिट ६ ची धडाकेबाज कामगीरी ! घरफोडीच्या २ गुन्ह्यात पाहिजे असलेला विधीसंघर्षित बालक ताब्यात.


पंकेश जाधव संपादक 7020794626 

गुन्हे शाखा यूनिट ६ पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी युनिट ६ हद्दीमध्ये वाहन चोरी व घरफोडी प्रतिबंधात्मक गस्त चालू असताना पो ना नितीन मुंढे ,पो हवा रमेश मेमाणे,पो ना कानिफनाथ कारखिले यांना माहिती मिळाली कि कोलवडी येथे घरफोडी करणारे इसमांपैकी १ निष्पन्न पाहिजे विधीसंघर्षित बालक हा Mit कॉलेज समोर ब्रीज खाली उभा असल्याची खबर मिळाली सदर ठिकाणी जाऊन वरील वर्णनाच्या इसमांस ताब्यात घेऊन त्यास त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले .वरील इसमानी त्याचे साथी दारासह कोलवडी येथे घरफोडी केली होती तेव्हा पासून तो फरार होता .त्याची पुढील कारवाई कामी वैद्यकीय तपासणी करून लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे
वरील नमूद विधीसंघर्षित बालक खालील गुन्ह्यात पाहिजे आहे .

Advertisement

१) लोणीकंद पो स्टे ७१३ /२०२४ भा न्या सं कलम ३०५ (अ),३३१(४)
२) कोंढवा पो स्टे ६५५/२०२४ भा न्या सं कलम ३३१(४), ३०५

सदरची कामगिरी मा शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ), मा निखिल पिंगळे (पोलीस उपायुक्त , गुन्हे शाखा ), मा सतीश गोवेकर सहा पोलीस आयुक्त -२) यांचे मार्गदर्शनाखाली मा प्रताप पोमण पोलीस निरीक्षक युनिट ६ पुणे शहर पो हवा रमेश मेमाणे ,पो ना नितीन मुंढे ,पो ना कानिफनाथ कारखिले ,पो अं सचिन पवार ,शेखर काटे ,ऋषिकेश ताकवणे ,समीर पिलाने ,ऋषिकेश व्यवहारे ,नितीन धाडगे ,बाळासाहेब तनपुरे ,प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदळे ,सुहास तांबेकर यांचे पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!