बेकायदेशीर रित्या पिस्टल बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त खंडणी विरोधी पथक १ ची कामगिरी
पंकेश जाधव संपादक 7020794626
खंडणी विरोधी पथक १ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर व मा. सह पोलीस आयुक्त सोो, पुणे शहर, मा. अप्पर पोलीस आयुक्त सोो, गुन्हे, पुणे शहर यांनी पुणे शहर आयुक्तालयात विना परवाना शस्त्र बाळगणा-या, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेचे आदेश दिलेले होते.त्याअनुशंगाने दिनांक १२/०८/२०२४ रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोशि/८८०२ मयूर भोकरे व पोहवा/६७८२ अमोल आवाड यांना त्यांच्या गुप्त हमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम कोंबडी पुल, मंगळवार पेठ पुणे येथे पिस्टल बाळगून थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तेथे जाऊन सापळा रचून संशयित इसमास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव बॉबी भागवत सुरवसे, वय २८ वर्षे, रा. सर्वे नं १२, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला पाठीमागे १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस मिळून आल्याने सदर आरोपी विरूद्ध फरासखाना पो स्टे गु.र.नं. १६२/२०२४ आर्म अॅक्ट ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने त्याच्याकडील आणखी १ पिस्टल व २ जिवंत काडतुसे वैभव कोलते रा. पिसर्वे, ता. पुरंदर, जि पुणे यास विकले असल्याचे समजल्याने इसम नामे वैभव चंद्रकांत कोलते, वय ३२ वर्षे, रा. मु पो पिसर्वे, ता. पुरंदर, जि. पुणे याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आलेले आहेत. दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अभिजीत पाटील, खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त १, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सपोनि अभिजीत पाटील,पोलिस अंमलदार मयुर भोकरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, रविंद्र फुलपगारे, मधूकर तुपसौंदर, प्रविण ढमाळ, गितांजली जांभुळकर यांनी कारवाई केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

