वाहचोरी करणाऱ्या आरोपी व दोन विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेवून बिबवेवाडी पोलीसांनी केले ०७ वाहनचोरीचे गुन्हे उघड
पंकेश जाधव संपादक 7020794626
बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- शहरामध्ये वाढत्या वाहन चोरीच्या गुन्हयांवर आळा बसावा याकरिता विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी आदेश दिल्याने त्या अनुषंगाने बिबवेवाडी पोलीस ठाणे कडील तपासपथक हे गुन्हा रजि.क्र.८१/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ या वाहनचोरीच्या गुन्हयातील बुलेट मोटर सायकलचा तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत असलेले अनोळखी तिन इसमांचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अमंलदार प्रणय पाटील व अभिषेक धुमाळ यांनी बिबवेवाडी ते वरवंड ता. दौंड, जि.पुणे पर्यंतचे १२० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून शोध घेत असताना त्यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गोपीनाथनगर वरवंड ता. दौंड, जि. पुणे येथील दोन विधी संघर्षीत बालक यांनी मोटर सायकल चोरली असल्याची व ते सुरतगांव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथे राहत आहे. नमुद माहितीच्या आधारे तपास पथकाकडील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, प्रविण काळुखे व अमंलदार यांचे पथक तयार करून विधी संघर्षीत बालकांना सुरतगांव ता. तुळजापुर, जि.धाराशिव येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे केले चौकशीवरून आरोपी नामे ओंकार शशिकांत साळुंखे, वय १९ वर्षे रा. सध्या मु.पो. बोळी, ता. खंडाळा, जि. सातारा यास गुन्हयात अटक करून त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेवून त्याचेकडून व विधी संघर्षीत बालकाकडून एकूण ३,५०,०००/-किमंतीच्या ०७ मोटर सायकल त्यामध्ये एक बुलेट, तिन यामाहा मोटर सायकल व दोन अॅक्टीव्हा, एक डयुएट मोपेड अशा मोटर सायकली हस्तगत करून बिबवेवाडी पो. ठाणे कडील ०४ गुन्हे, भारती विद्यापीठ पो. ठाणे ०१, खडक पो ठाणेकडील ०१, दिघी पोलीस ठाणेकडील ०१ असे एकूण ०७ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. नमुद आरोपी व विधी संघर्षीत बालकांनी चोरलेल्या दुचाकी विकून मिळणाऱ्या पैशामधून मौजमजेकरिता यावी या उद्देशाने दुचाकी चोरल्याचे सांगितले आहे. परंतू त्यांनी दुचाकी विकण्याअगोदरच त्यास जेरबंद व ताब्यात घेण्यात बिबवेवाडी पोलीसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री प्रविण पवार, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री गणेश इंगळे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रविण काळुखे, पोलीस अमंलदार, शामराय लोहोमकर, संतोष जाधव, प्रणय पाटील, अभिषेक धुमाळ, आशिष गायकवाड, विशाल जाधव, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव