५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ स्पर्धेचा तिसरा दिवस पोलीस उप मुख्यालय, बऱ्हाणपुर बारामती, पुणे ग्रामीण येथे संपन्न
आसमा सय्यद पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन कोल्हापूर :- ५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ आयोजित करण्याचा मान यावर्षी पुणे ग्रामीण पोलीस दलास मिळाला असलेने सदरील क्रीडा स्पर्धा दि. १७.११.२०२५ ते दि.२१.११.२०२५ या कालावधीमध्ये पोलीस उपमुख्यालय, बऱ्हाणपुर बारामती पुणे ग्रामीण विदयाप्रतिष्ठान मुख्य मैदान बारामती पुणे, अॅग्रीकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट मुख्य मैदान शारदानगर, बारामती विर सावरकर भवन जलतरण तलाव बारामती येथे उत्साहपुर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होत असून पोलीस विभागाकडील खेळाडू कर्तव्यावर असणारा ताणतणाव व दररोजचे धक्काधक्कीचे जीवन याचा विचार बाजुला सारुन स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत.
स्पर्धेचा हा तिसरा दिवस असून स्पर्धा जशा पुढे जात आहेत तशा अधिकचा उत्कंठावर्धक होत आहेत. सांघिक प्रकारात चुरशीचे सामने होत असून अनेक खेळाडू, त्यांचे कसब दाखवत त्यांच्या संघांना विजयी करत आहेत.
सदर स्पर्धेच्या तिसन्या दिवशी दि.१९.११.२०२५ रोजी विविध सांघिक व वैयक्तीक स्पर्धा पार पडल्या असून यामध्ये ३००० मी स्टीपलचेस पुरूष हर्षवर्धन दबडे सातारा, ४०० मीटर धावणे पुरूष संजय कालु गावीत सातारा, १५०० मीटर धावणे पुरूष ओंकार कुंभार कोल्हापुर गोळाफेक पुरूष ईशराक शेख पुणे ग्रामीण, ४ x ४०० मीटर रिले पुरूष सातारा टीम, ४ ४ १०० मीटर रिले पुरूष सातारा टीम, १५०० मीटर धावणे महिला सोनाली देसाई कोल्हापुर ४ x ४०० मीटर रिले महिला सातारा टीम, ४ X १०० मीटर रिले महिला सातारा टीम, गोळा फेक महिला माधवी यादव सातारा या खेळाडुंनी उत्कृष्ठ नैपुण्य दाखवुन सुवर्ण पदक मिळवले.
तसेच वेटलिफटींग या वैयक्तीक खेळामध्ये पुरुष गटात ६० किलो वजन गट तेजस भोसले सातारा, ६५ किलो वजन गट निखील जनगाडे सातारा, ७१ किलो बजन गट गणेश देवरूखे सातारा, ७९ किलो वजन गट संतोष मुलुक सातारा, ८८ किलो बजन गट सचिन अडमाने सातारा, ९४ किलो वजन गट दिपक पोळ सातारा, ११० किलो वजन गट स्वप्नील पाटील सातारा, ११० किलो वजन गटावरील समीर काशिद सातारा तर महिला गटात ४८ किलो वजन गट दामिनी सपकाळ सातारा, ५३ किलो वजन गट निकीता वाघ सातारा, ५८ किलो वजन गट वैष्णवी शिंदे सातारा, ६३ किलो वजन गट अपेक्षा किर्वे सातारा, ६९ किलो वजन गट मयुरी कुंभार सातारा, ७७ किलो बजन गट माधवी यादव सातारा, ८६ किलो वजन गट धनश्री भगत पुणे ग्रामीण, ८६ किलो वजन गटावरील कांचन टिकमकर पुणे ग्रामीण, तर पॉवरलिफटींग पुरूष गटात ६६ किलो वजन गट संकेत शेलार सातारा, ७४ किलो वजन गट गणेश देवरूखे सातारा, ८३ किलो वजन गट संतोष मुळीक सातारा, ९३ किलो वजन गट प्रतिक पाटील सोलापुर, १०५ किलो वजन गट विनायक डोंगरे कोल्हापुर, १२० किलो वजन गटावरील समीर काशिद सातारा, तर महिला गटात ४७किलो वजन गट दामिनी सपकाळ सातारा, ५२ किलो वजन गट निकीता वाघ सातारा, ५७ किलो वजन गट सपना यमाजी सोलापुर शहर, ६३ किलो वजन गट अपेक्षा किर्वे सातारा, ६९ किलो वजन गट मयुरी कुंभार सातारा, ८४ किलो वजन गट धनश्री मांडवे सातारा, ८४ किलो वजन गटावरील कांचन टिकमकर पुणे ग्रामीण यांनी विशेष कौशल्य दाखवून सुवर्ण पदाच्या मानकरी ठरले.
क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळांच्या उपांत्य फेरीचे सामने सुरु झाले असुन दोन गटामधून गुणांकानुसार प्रथम व द्वितीय क्रमांकाचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. फुटबॉल सांघिक स्पर्धेच्या वेळी सातारा विरूध्द सांगली संघामध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यामध्ये सातारा संघाने बाजी मारली.
स्पर्धे दरम्यान खेळाडूंना होणाऱ्या दुखापती व प्राथमिक उपचार वेळेत उपलब्ध व्हावेत याकरीता श्रीमती विखे मॅडम, वैदयकीय अधिकारी पुणे ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली वैदयकीय पथक व रुग्णवाहीका मैदानावर तैनात ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मैदानावर एनर्जी ड्रिक्स, पिण्याचे पाणी तसेच सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
मा. श्री संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, पुणे, मा.श्री. सुदर्शन राठोड, उपविभागीय अधिकारी, बारामती विभाग व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
सदर आयोजित स्पर्धेचा लाभ घ्यावा याबाबत पोलीस दलाकडून विदयार्थ्यांना निमंत्रित करण्यात येत आहे. या दरम्यान जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षण संस्था (रुई गांव), मराठी माध्यमिक शाळा विदया प्रतिष्ठान, बारामती, प्राथमिक व माध्यमिक शाळा विदया प्रतिष्ठान बारामती, इंग्लीश मॉर्डन स्कुल (शेळगाव, वालचंदनगर) व न्यु इंग्लिश स्कुल (कारखेल) या शाळांनी ५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ ला आज भेट दिली व स्पर्धेचा आनंद घेत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

