शिरुर तालुक्यामधील धोकादायक इसम एम पी डि ए कायदयांतर्गत कारागृहात स्थानबध्द


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
शिरुर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण 
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे  :- मा.श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण हे पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध शस्त्र बाळगणे, अवैध घातक हत्यारे बाळगणारे, अवैध वाळु व्यवसाय करणारे, महिलांविरुध्दचे गुन्हे करणारे, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे धोकादायक व्यक्ती यांचे विरुध्द विशेष मोहिम राबवित आहेत. पुणे ग्रामीण जिल्हयाचे हददीमधील गुन्हेगारी मोडीत काढणेसाठी दरोड, जबरी चोरी, हायवे रोडवरील लुटमारी करणारे, व्यावसायीकांकडे खंडणीची मागणी करणारे, खुनाचा प्रयत्न करणारे, अवैधपणे अग्नीशस्त्रे बाळगणारे, धोकादायक व्यक्ती यांचे विरुध्द कारवाईचा बडगा उगारुन एम.पी.डि.ए कायदयांतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश पुणे ग्रामीण जिल्हयामधील पोलीस स्टेशनला दिलेले होते.
त्याप्रमाणे शिरुर पोलीस स्टेशन हददीमधील डोंगरगण ता. शिरुर जि. पुणे येथे वास्तव्यास असलेला धोकादायक इसम नामे विकास ऊर्फ काज्या बाबाजी चोरे वय वर्षे २५रा. डोंगरगण ता. शिरुर जि. पुणे यांचे विरुध्द यापुर्वी बेकायदेशीर गर्दी जमाव जमवुन धारदार घातक हत्याराचा वापर करुन आपखुशीने साधी, गंभीर दुखापत करुन खुनाचा प्रयत्न करणे, संगणमत करुन महिलेचा विनयभंग करणे, बेकायदेशीर गदी जमाव जमवुन घातक साधनांचा वापर करुन आपखुशीने गंभीर दुखापत करणे व खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीरपणे अग्नीशस्व बाळगणे, अवैधपणे उत्खनन करुन मुरुमाची चोरी करुन पर्यावरणाचा -हास करणे या सारखे ५ गुन्हे दाखल होते. तो सराईत धोकादायक असल्याने त्याचेविरुध्द एम पी डि ए कायदयांतर्गत कार्यवाही होणेकामी श्री. संदेश केंजळे यांनी मा.श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन मा. पोलीस अधीक्षक साो, पुणे ग्रामीण यांनी करुन तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला होता.
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी साो, यांनी इसम नामे विकास ऊर्फ काज्या बाबाजी चोरे वय वर्षे २५रा. डोंगरगण ता. शिरुर जि. पुणे याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारची कृत्ये करण्यापासुन प्रतिबंध करण्याचे दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपटटीगुंड, हातभटटीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणा-या आणि मानवी अपव्यापार करणा-या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत मुख्य अधिनियम १९८१ चा (सुधारणा अधिनियम सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९) अन्वये आदेश पगम/एम पी डि ए/एस आर /०६/०१/२०२५ दिनांक १९/०१/२०२५ अन्वये स्थानबध्द करण्याचा आदेश पारीत केला आहे.
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी सारे यांचे स्थानबध्दतेचे आदेशान्वये इसम नामे विकास ऊर्फ काज्या बाबाजी चोरे वय वर्षे २५रा. डोंगरगण ता. शिरुर जि. पुणे यास शिरुर पोलीस स्टेशकडील पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे, यांनी शिरुर पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन शोध घेवुन त्यास दिनांक १९/०९/२०२५ रोजी ताब्यात घेवुन मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे दाखल करुन स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी हि मा.श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा.रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, पुणे ग्रामीण मा. प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरुर उपविभाग शिरुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे, शिरुर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण, शिरुर पोलीस स्टेशन, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, रामदास बाबर, पो.हवा मंगेश थिगळे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पो. हवा परशराम सांगळे, पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे, निरज पिसाळ शिरुर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!