महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत रु.४,८३,९५०/- किंमतीचा उच्चप्रतिचे विदेशी मद्दसाठा जप्त करण्यात आला.
पंकेश जाधव संपादक 7020794626
राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१ पुणे
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०१/०२/२०२५ रोजी मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य डॉ. श्री. विजय सुर्यवंशी सो., मा. संचालक (दक्षता व अंमलबजावणी) श्री. प्रसाद सुर्वे सो. मा. विभागीय उप-आयुक्त, पुणे विभाग – श्री. सागर धोमकर सो, अधीक्षक श्री. चरणसिंग राजपुत सो यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१ पुणे श्री. देवदत्त पोटे यांचे पथकाने मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पुणे शहरात तसेच आजु बाजुच्या परिसरात कार्यरत असलेले मोठे हॉटेल्स, पब्स, रिसॉर्टस या ठिकाणी होण्याऱ्या पार्या तसेच ग्राहकांसाठी उच्चप्रतीचे अवैध मद्द नियमीत पुरवठा करीत असल्याची मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार वानवडी हद्दीत लुल्लानगर चौक ते नेताजी नगर कॉलनी रोडच्या डाव्या बाजुला ता. हवेली जि. पुणे या ठिकाणी एक इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस वाहतुकीस तसेच स्वतःजवळ बाळगण्यास प्रतिबंधीत असलेले उच्च प्रतिचे विदेशी मद्द विक्री उद्देशाने पुरवठा करणार असल्याची खात्रीलायक बातमी समजल्यानुसार सापळा रचण्यात आला.
सदर ठिकाणी आरोपी क्र.१ नामे राजकुमार उदा नारायण उपाध्याय याचे ताबेकब्जातुन त्याच्या जवळ असलेल्या बॅग मधुन ७५० मिली क्षमतेच्या विविध ग्रॅण्डच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्दाच्या एकुण ११ सिलबंद बाटल्या जप्त करुन त्यास ताव्यात घेवून त्याकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहिती वरुन सदरच्या उच्च प्रतिच्या विदेशी-महाच्या बाटल्या हया आरोपी क्र.२ दिपेश कुमार विजय कुमार सहा याने तो रहात असलेल्या धनश्री आशियाना सोसायटी ए विंग फ्लॅट नं. ७०१ मोहम्मदवाडी, पुणे येथुन त्याला दिल्या असंल्याची माहिती दिली त्यानुसार आरोपी क्र.१ यास सोबत घेवुन स्टाफसह आरोपी क्र.२ याचे रहात असलेल्या वरील नमुद ठिकाणी छापा टाकला असता आरोपी क्र.२ याचे ताबे कब्जातुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस, स्वतः बाळगणे तसेच वाहतुक करण्यास प्रतिबंधीत असलेलें उच्चप्रतीचे विदेशी मद्दाच्या ७००/७५० मिली क्षमतेच्या विविध ग्रॅण्डच्या-एकुण १२८ सिलंबद बाटल्या व मद्द वाहतुक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॅग्ज, मोबाईल जप्त करुन दोन्ही आरोर्पीच्या ताब्यातील एकुण कि.रु.४,८३,९५०/- किंमतीचा दारुबंदी गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, पुणे या पथकाचे निरीक्षक श्री. देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक श्री. डी. एस. सुर्यवंशी, श्री.पी.ए. कोकरे तसेच सहाय्यक-दुय्यम निरीक्षक श्री. सावळे जवान सर्वश्री अहमद शेख, चंद्रकांत नाईक, भरत नेमाडे, अक्षदा कड, अमर कांबळे, विजय भानवसे, जवान-नि-वाहनचालक शरद हांडगर यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्हयांचा तपास भरारी पथक क्र.१ पुणे पथकाचे निरीक्षक श्री. देवदत्त पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्री. दिनेश एस सुर्यवंशी हे करीत आहेत. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत उच्च प्रतिचे विदेशी मद्दाच्या अवैध विक्रोमुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचे मोठया प्रमाणात नुकसान होत असते. याबाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन, पुणे विभागाशी संपर्क साधावा असे जाहिर आवाहन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

