स्थानिक गुन्हे शाखा व पौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कारवाई !खुनाचा गुन्हा उघडकीस आणून खून करणाऱ्या आरोपीस अटक


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
स्थानिक गुन्हे शाखा व पौड पोलीस स्टेशन
महा पोलिस न्यूज  ! ऑनलाईन पुणे  : पौड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५२/२०२५ मा.न्या.सं.क १०३(१), २३८ प्रमाणे दि. १३/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे, सदर गुन्हयात अनोळखी पुरुषाचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घोटावडे ता मुळशी जि पुणे गावचे हद्दीत टाकून देण्यात आला होता. मृतदेह कुजण्यास सुरूवात झालेली होती. मृतदेहाचे गळ्यावर वार व डोक्यात जखमा होत्या. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अनोळखी पुरुषाचा अज्ञात कारणास्तव, धारदार हत्याराने व कशानेतरी वार करून खून करून पुरावा नष्ट करण्याकरीता मृतदेह टाकून दिला असलेबाबत पो. हवा. दिलीप गंगाराम सुपे नेम, पौड पोलीस स्टेशन यांनी फिर्याद नोंदविल्याने वरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता, मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पौड पोलीस स्टेशन कडील पथकांनी एकत्रित सुरू केला. घटनास्थळावर आधार कार्ड मिळून आले होते, त्या आधार कार्डवरील नाव पत्ता बायत तपास केला असता, मिळून आलेला मृतदेह हा आशुतोष मनोहर वैशंपायन वय ४७ वर्षे रा. २६०१, ग्लेन हाईट्स, क्लिफ अव्हेन्यु, हिरानंदानी गार्डन, हेरीटेज गार्डन पवई, मुंबई ७६ वांचा असल्याचा संशय निर्माण झाला, त्याचबरोबर आशुतोष मनोहर वैशंपायन हे पुण्यातील घरी राहणेसाठी एकटेच लखनऊ येथून पुणे येथे दि. ०४/०९/२०२५ रोजी रेल्वेने गेले असल्याचे त्यांची पत्नी सी अक्षदा वैशंपायन यांनी सांगितले, त्या माहितीचे आधारे तपास पथकांनी पुणे रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृतदेहाचे अंगावरील कपडे व संशयित आशुतोष वैशंपायन यांचे अंगावर रेल्वे प्लॅट फॉर्मवर असणारे कपडयाचे वर्णन जुळले, त्या आधारे त्याचा मागोवा घेत त्यांनी पुणे स्टेशन ते स्वारगेट असा रिक्षाने प्रवास केला, त्यानंतर स्वारगेट परिसरातून ते दुसऱ्या रिक्षाने सिंहगड रोड बाजूकडे गेल्याचे निदर्शनास आले.
गोपनीय बातमीदाराकडून संशयित रिक्षाची व रिक्षा चालक यांची माहिती मिळविली असता, रिक्षा चालक नामे सचिन प्रकाश जाधव वय ४२ वर्षे रा. केशव कॉम्प्लेक्स लेन नंबर ४ धनकवडी, पुणे असे असून तो सराईत गुन्हेगार आहे अशी माहिती मिळाली. त्या माहितीचे आधारे सचिन जाधव याचा शोध सुरू केला असता, तो राहते घरातून परागंदा झाला होता, तो कोठे गेला हे त्यांचे कुटुंबाला माहिती नव्हते. त्यामुळे त्याचेवरील संशय बळवला आणि तपास पथकांनी त्याचेवर लक्ष केंद्रीत करून दि. २०/०९/२०२५ रोजी आरोपी नामे सचिन प्रकाश जाधव वय ४१ वर्षे रा. केशव कॉम्प्लेक्स लेन नंबर ४ धनकवडी, पुणे पास धनकवडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी करता त्याचेच रिक्षामध्ये आशुतोष मनोहर वैशंपायन हे स्वारगेट येथून बसले होते, आशुतोष वैशंपायन हे दारू पिलेले होते, त्यांचे कडील एटीएम कार्डने सचिन जाधव याने त्यांना पैसे काढून दिले, तेव्हा आशुतोष वैशंपायन यांचे खात्यावर लाखो रूपये असल्याचे सचिन जाधव यास समजले. त्या पैशांचे लोभापायी त्याने आशुतोष मनोहर वैशंपायन यांचा खून करून घोटावडे गावचे हद्दीत जावून त्यांचा मृतदेह फेकून दिला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून आरोपी सचिन जाधव याने तशी माहिती सांगण्यात आली आहे.
आरोपी सचिन प्रकाश जाधव यास मा. न्यायालयात हजर केले असता, त्याची दि. २५/०९/२०२५ रोजी पर्यत पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेली आहे. तसेच सराईत आरोपी सचिन जाधव याचेवर जबरी चोरी, चोरी चे पुणे शहरात एकूण १३ गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, सारे. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पुजारी, हवेली विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पौड पो स्टे चे पो नि संतोष गिरीगोसावी, स्था.गु.शा.चे सपोनि दत्ताजीराव मोहिते, पोसई हनुमंत पासलकर, पौड पो स्टे थे सपोनि संदिप चव्हाण, पोसई योगेश जाधव, श्रेणी पोसई नाना शेंडगे, स्वा.गु.शा.चे पोलीस अंमलदार तुषार भोईटे, अमोल शेडगे, मंगेश भगत, राजू मोमीण, अतुल डेरे, वैभव सावंत, पौड पो स्टे चे पोलीस अंमलदार नंदू गडाळे, रॉकी देवकाते, दिलीप सुपे, प्रशांत बुनगे, ईश्वर काळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल सुर्यवंशी, आकाश पाटील, संदिप दराडे, बाबा पाटील, सुशांत गायकवाड, श्रीकृष्ण पोरे यांनी केली असून पुढील तपास पीड पोलीस स्टेशन करत आहेत.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!