सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू; वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून केला गुन्हा दाखल


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना दिनांक ३१/१/२०२५ रोजी सायंकाळी बातमीदार मार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील श्री संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीमध्ये झाडाचे खाली काही इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस पथक व पंचाना बातमीचा आशय सांगून छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे

1) गोरख रघूनाथ मोहीते, वय 65 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ, जि.पुणे,
2) सुनिल आप्पा बंडगर, वय 30 वर्षों, रा.न-हेगाव ता हवेली जि पुणे मुळ रा काश्टी ता लोहारा जि उस्मानाबाद,
3) धोंडू दत्तू बोरकर, वय 52 वर्शे, रा. वेहेरगाव, ता. मावळ, जि. पुणे,
4) विश्वनाथ संभाजी गायकवाड वय 44 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ, जि.पुणे,                                                                   5) गजानन किसन पारधी, वय 52 वर्षे, रा.भाजे, ता.मावळ, जि. पुणे,
6) सचीन गणेश तिकोणे, वय 41 वर्षे, रा.पाटण, ता.मावळ, जि.पुणे,
7) मधूकर केशव बगाडे, वय 72 वर्षे, रा.मळवली, कामषेत, ता. मावळ, जि.पुणे,
8) विलास भागुजी देशमुख, वय 42 वर्षे, रा. वेहेरगाव, ता.मावळ, जि.पुणे,
9) संदीप षांताराम कौदरे वय 36 वर्षे, रा. वाकसई, ता. मावळ, जि.पुणे
10) चंद्रकांत देवकर, रा. वेहरगांव, ता. मावळ, जि. पूणे

असे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना रोख रक्कम, साहित्य, मोटार सायकल, पावती पुस्तके, मोबाईल फोन असा एकूण १,६४,७००/- रुपयाचा मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ला मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हे दाखल केला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकातील पोहवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!