७१ वर्षीय वृध्दाची ठकवणुक करणा-या सराईत गुन्हेगाराला २४ तासाच्या आत केले जेरबंद
दत्ता मस्के पुणे प्रतिनिधी
सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२५/१०/२०२५ रोजी आशिष अपार्टमेट आनंदनगर सिंहगडरोड पुणे येथे झालेल्या घरफोडीबाबत अज्ञात इसमाविरुध्द सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४९४/२०२५ भा.न्या.सं.क. ३१८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे सदर अज्ञात इसमाचा शोध घेवुन गुन्ह्याचा तपास करीत असताना दि.२६/१०/२०२५ रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार संदिप कांबळे व समीर माळवदकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दि.२५/१०/२०२५ रोजी वृध्दा इसमांची ठकवणुक करणारा इसम हा सय्यदनगर ग.नं.२३ हडपसर पुणे येथे मोपेड गाडी घेवुन थांबलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांना कळविली असता, त्यांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस उप-निरीक्षक अमोल मालुसरे व पोलीस स्टाफ असे खाजगी वाहनाने बातमीतील ठिकाणाजवळ आले असता बातमीप्रमाणे एक इसम थांबलेला दिसला. सदर इसमास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव व पत्ता इरफान बबलु अली वय २४ वर्षे रा.ग.नं.२३ बानु बशिर शेख यांचे खोलीत खोली नं. १ सय्यदनगर हडपसर पुणे असे सांगितले. त्यास सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात दि.२७/१०/२०२५ रोजी अटक करुन त्याचेकडुन दाखल गुन्हयातील ठकवणुक केलेली सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली असुन त्याने गुन्हा करणेसाठी वापरलेली अॅक्सीस मोपेड मोटार सायकल ही जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेंद्र बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर श्री दिलीप दाईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उल्हास कदम यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस उप-निरीक्षक अमोल मालुसरे, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, निलेश भोरडे, सागर शेडगे, विनायक मोहीते, गणेश झगडे, सतिश मोरे, समीर माळवदकर, संदिप कांबळे व तानाजी सागर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

