गुन्हे शाखा युनिट 2ची दमदार कामगिरी ! मोक्का गुन्हयातील पाहीजे आरोपी शिताफीने ताब्यात 


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट 2 पिंपरी चिंचवड शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक 18/04/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडून मोक्का गुन्हयातील पाहीजे आरोपींचा शोध घेत असतांना पोकॉ 1920 अजित सानप यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरुन व पोना 1603 देवा राऊत यांनी केलेल्या सखोल तांत्रीक विश्लेषणावरुन* *निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 588/2023 भादवि कलम 307, 302, 326, 324, 143, 147, 148, 149, 504, भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सह 135 , महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन 1999 या कायद्याचे कलम 3 (1) (i) (ii), 3 (4) प्रमाणे* दाखल गुन्हयातील पाहीजे *आरोपीत नामे सागर उर्फ वड्डे श्रावण खळगे वय- 28 रा रुम नं 315 बि नं 5 उर्वेला हौसिंग सोसायटी ओटास्किम निगडी पुणे* हा माजलगाव जिल्हा बीड येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेने गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोहवा 443 प्रमोद वेताळ, पोना 1603 देवा राऊत, पोकॉ 1920 अजित सानप यांचे पथक मा. वरीष्ठांचे आदेशाने रवाना केले होते. सदर पाहीजे आरोपीचा माजलगांव जिल्हा बीड येथे शोध घेवून सापळा लावला असतांना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने पाहीजे आरोपी सागर उर्फ वड्डे श्रावण खळगे हा पळुन जात असतांना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीत याचेकडे सखोल विचारपुस करुन त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास मा. सहा.पोलीस आयुक्त साो. चिंचवड विभाग यांचेकडे हजर केले आहे.

Advertisement

 आरोपीचा पूर्व इतिहास

निगडी पोस्ट 27/2017 भादवि कलम 143, 147, 148, 149, 325, फॉर्मेट 4 ( 25) नको का कलम 37(1)135

निगडी पोस्टे 853/2018 भादवि कलम 324,323,504,34

 


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!