समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! सराईत वाहन चोरास ठोकल्या वेड्या


पंकेश जाधव संपादक 7020794626

समर्थ पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री सौरभ माने, श्री सुनिल रणदिवे व तपास पथकातील पोलिस अमंलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार इम्रान शेख व पोशि शरद घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पदमजी पार्क लेन, राजेवाडी झोपडपट्टीच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालयासमोर एक इसम दुचाकी मोटार सायकलसह संशयितरित्या थांबलेला असलेबाबत माहीती मिळाली. सदरची खबर पोलीस उप निरीक्षक माने व रणदिवे यांनी समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांना कळविली असता, त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करून योग्य ती कारवाई करणेस सांगितल्याने. तपास पथकातील स्टाफ खाजगी वाहनाने बातमीचे ठिकाणी जायुन खात्री केली असता, बातमीतील इसम हा पोलीसांना पाहताच दुचाकी मोटार सायकल तेथेच सोडुन पळुन जावु लागला त्यास लागलीच पोना रहीम शेख, पोशि बोराडे, पोशि दरवडे यांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने पहिले उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर इसमास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता, त्याने आपले नाव ललीत सुनिल भोई/परदेशी, वय-२९ वर्षे, धंदा नाही रा. विश्वनाथ अर्पाटमेन्ट, पाचवा माळा, ८६ पर्वती गावं, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात समर्थ पो स्टे गुरक्र ७८/२०२४, कलम ३७९ भादविमध्ये चोरीस गेलेली दुचाकी मोटार सायकल क्रमांक एम एच १२ एन क्यु ६५८३ ही मिळुन आली त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने खालील नमुद प्रमाणे चोरी कलेली वाहने आरोपीने निवेदन पंचनाम्याने पोलीसांचे ताब्यात दिले.

Advertisement

१) विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.नं.७४/२०२४ भा.द.वि. कलम-३७९ प्रमाणे मधील चोरी केलेले वाहन ५,०००-०० रु. किंमतीची एक सिलव्हर ज्युपीटर मोपेड मो. सा. आर टी ओ नंबर MH 12 ND 5467 असा, तिचा चॅसी नं. MD626BG4XG1E72251 व इंजीन नं. BG4EG1968594 असलेले असे (जु.वा.किं.अं)

२) सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं.७०/२०२४ भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे मधील वाहन २०,०००-०० रु. किंमतीची एक लाल रंगाची अॅक्टीव्हा थीजी मोपेड तीचा पुणे आर टी ओ नंबर MH 12 NL 6774 तिचा चॅसी नं. ME4JF505HGU300029 व इंजीन नं. JF50EU3299779 असलेला असे (जु.या. किं. अं) असे वाहन

३) मानोरा पोलीस स्टेशन जिल्हा वाशीम गु.र.नं.१०३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील वाहन३०,०००-00 रु. किंमतीची एक लाल रंगाची MAESERO कंपनीची स्कुटर तीचा आर टी ओ नंबर MH 37 P 7234 तिचा चॅसी नं. MBLJF32ADEGL14532 व इंजीन नं.JF32AAEGL22694 असलेला असे (जु.वा. किं. अं) असे वाहन

४) दत्तवाडी/पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं.१५०/२०२४ भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे मधील वाहन १५,०००-00 रु. किंमतीची एक होंडा कंपनीची डिओ गाडी काळया रंगाची सन २००९ चे मॉडेल असलेले क्र. आर टी ओ नंबर MH 12 FS 1247 तिचा चॅसी नं. ME4JF114K98081801 व इंजीन नं. JF11E6158808 असलेला असे (जु.वा.किं.अं) असे वाहन निवेदन पंचनामा अंतर्गत जप्त करण्यात आले. असे एकूणन ०५ दुचाकी मोटार सायकल जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच सदर आरोपीतांवर यापुर्वी देखील पुणे शहर परीसरात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. प्रविण पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर) मा. श्री. संदिपसिंह गिल्ल (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर) श्रीमती रुक्मीणी गलांडे, (सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे) श्री. मारुती पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो. स्टे), निलेश बडाख, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक श्री सौरभ माने व पोलीस उपनिरीक्षक श्री सुनिल रणदिवे, स.फौ. संतोष पागार, पो. हवा. रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, औचरे, पो.ना. रहीम शेख, पोलीस अंमलदार कल्याण बोराडे, शरद घोरपडे, अविनाश दरवडे यांचे पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!