अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या इसमा कडुन १,६९,६००/- रु किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हा अंमली पदार्थ केला जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर हया व पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक २०/०१/२०२४ रोजी पेट्रोलींग करीत असताना पुणे रेल्वे स्टेशन परिसरात, पुणे येथील सार्वजनिक ठिकाणी रोडवर इसम नामे शेबाज शब्बीर कुरेशी, वय २४ वर्षे, रा वडाला आर.टी.ओ. ट्रान्झेस कॅम्प चाळ, गल्ली नं १६ मुंबई याच्या ताब्यातुन ८ ग्रॅम ४८ मि.ग्र. मॅफेड्रॉन (एम.डी.) किं.रु.१,६९,६००/- चा अंमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुध्द बंडगार्डन पो.स्टे. येथे गु.र.नं. २३/२०२४. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे (मा. पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतीष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदिप जाधव, रविन्द्र रोकडे, महेश साळुंके, अझीम शेख, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!