एनटेक्स ट्रान्सपोर्टस्टेशन सर्व्हिस प्रा.लि.कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4 चे ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 938/2023 भादवी कलम 381 चा गुन्हा दाखल होता.सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना आज दिनांक 20/01/2024 रोजी युनिट 4 पोलीस हवा. सारस साळवी व पोलिस अंमलदार अमोल वाडकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भोसले नगर येथील बँक ऑफ बडोदा या बँकेसमोरील रोडवर पुणे येथे स्वप्निल खताळ व त्याचा मित्र येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कमी किमतीत मोबाईल विकत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली. लागलीच युनिट 04 कडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे त्याचे नाव 1) स्वप्निल जिमा कथा वैबावीस वर्षे राहणार बावधन खुर्द विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ बावधन पुणे 2) इंद्रजीत गजेंद्रसिंग परदेशी, वय 36 वर्षे राहणार जयमाला नगर, लेन नंबर 6, दिलीप वळसे यांचे घरात भाड्याने, जुनी सांगवी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यात एकूण 05 मोबाईल रुपये किंमत 1,00,000/- चे मिळून आले. दाखल गुन्हा उघडकीस आणून दाखल गुन्ह्यातील आरोपी याची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाई कामी चतु:र्श्रुंगी पोलीस ठाणे पुणे यांचे ताब्यात जप्त मुद्देमालासह देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त पुणे, मा. अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. सतीश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -2, मा. सोमनाथ जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 04 यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, पोलिस उपनिरिक्षक जयदीप पाटील, पोलीस हवा. हरीश मोरे, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, संजय आढारी, अमोल वाडकर, वैभव रणपिसे, शितल शिंदे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव