चारचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड करून दोन पिकअप वाहने व ट्रकमधील पाण्याची टाकी असा एकूण नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल केला हस्तगत


पत्रकार  :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण

 स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सासवड शहरातील धुमाळ पेट्रोल पंपासमोर फिर्यादी नामे अनिल बाबुराव फडतरे वय ४७ वर्षे रा. सुपे खुा ता. पुरंदर, जि. पुणे यांनी त्यांचे मालकीचा ट्रक नं. MH-06-K-5429 असा दि. ०९/०२/२०२४ रोजी रात्रीचे वेळो ट्रकमधील पाण्याच्या टाकीसह चोरीस गेला होता. त्याबाबत सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२/२०२४ भा.दं.वि.का.क. ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्हयाची कार्यपद्धतीचा अभ्यास केला असता, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारचाकी वाहने चोरणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरूवात केली. तपासा दरम्म्यान पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे १) ओमकार हरी शेळके, वय १९ वर्षे, रा. होलेवस्ती, उंड्री ता. हवेली जि. पुणे याने त्याचे साथीदाराचे मदतीने केला आहे. बातमीचे आधारे दि. २४/०२/२०२४ रोजी त्यास उंड्री परीसरातून त्यास व त्याचा साथीदारा नामे २) मेहबूब ऊर्फ राजु अब्दुल शेख वय १९ वर्षे रा. आदर्श कॉलनी, हांडेवाडी ता. हवेली जि. पुणे, यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले असून गुन्हयातील चोरी केलेल्या ट्रक व पाण्याची टाकी खरेदी करणारा आरोपी नामे ३) फाजील अहमदखान पठाण, वय २९ वर्षे रा. बाबानगर, ता. उदगीर, जि. लातूर यास ताब्यात घेवून त्याचेकडून पाण्याची टाकी हस्तगत करणेत आलेली आहे. गुन्हयातील ट्रक आरोपी नामे अहमद चांदपाशा शेख (पाहिजे आरोपी) यास विक्री केला असल्याने आरोपी फाजील पठाण याचेकडून ट्रक विक्री करून मिळालेली रोख रक्कम हस्तगत करणेत आलेली आहे. अटक आरोपी क्र. १ ते ३ यांचेकडून आणखी दोन पिक अप वाहने हस्तगत करणेत आलेली असून सदर पिकअप वाहनांबाबत तपास करता १) जळकोट पो स्टे जि. लातूर गु.र.नं २६/२०२४ भादंवि ३७९, २) लोणीकाळभोर पो स्टे गुरनं ११५/२०२४ भादंवि ३७९ प्रमाणे गुन्हे उघडकीस आले असून आरोपी क्र. १ ते ३ यांचेकडून पाण्याची टाकी, रोख रक्कम, दोन पिकअप वाहने असा एकूण नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, सो, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री श्रीकांत पांडुळे, भोर विभाग, सासवड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि कुलदीप संकपाळ, सपोनि योगेश लंगुटे, पोसई प्रदीप चौधरी, पोलीस अंमलदार विजय कांचन, राजु मोमीण, अतुल डेरे, स्वप्निल अहीवळे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, धिरज जाधव, सासवड पो स्टे कडील पोलीस अंमलदार सपोनि बाजीराव ढेकळे, पोसई अतुल खांदरे, पोलीस अंमलदार गणेश पोटे, जब्बार सय्यद, यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशन हे करत असून गुन्हयातील अटक आरोपींना न्यायालयाने दि. ०२/०३/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!