मावळात होणार निसर्गाच्या सान्निध्यात बाल साहित्य संमेलन


प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलिस न्यूज !ऑनलाईन पुणे :- मावळ महाराष्ट्र साहित्य परिषद तालुका यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या परीघ दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक सुरेश साखोळकर जेष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ मराठी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ज्या कविता लिहिल्या होत्या त्या कवितांचे परीघ या दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आले मावळ टाकी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या कविता लिहिलेल्या आहेत यामध्ये जिल्हा परिषद शाळा मळवंडी ढोरे, करूंज, निगडे, सांगिसे, तळेगाव, कामशेत इत्यादी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या कविता लिहिलेल्या आहेत 52 कवितांचा हा परीघ दिवाळी अंक आहे आई ,बाबा, शाळा ,भारत शेतकरी, देश,निसर्ग, मोबाईल इत्यादी विषयांवर कविता लिहिलेले आहेत.
या मुलांच्या कविता बघून अध्यक्ष सुरेश साखळकर यांनी सांगितले की मावळ तालुक्यातील बाल साहित्यिक असणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी आपण भविष्यात मुलांचे साहित्य संमेलन निसर्गाच्या सानिध्यात घेवू या
यावेळी शिक्षक वृंद तसेच आयोजन करते ज्योती भोई व अन्सारी मॅडम शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रथम सहा क्रमांक कडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!