विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाने केले जेरबंद.


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन गु.रजि.नं.१३०७/२०२३ भा.दं.वि.कलम ३५४ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुनचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व १२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पीडीत आठ वर्षाच्या लहान मुलीचा अनोळखी इसमाने विनयभंग केला होता. गुन्हा दाखल झालेपासुन सदर पीडीत खुप दडपणाखाली होती. परंतु आरोपीबाबत काही एक माहिती उपलब्ध नसल्याने आरोपी अद्यापपावेतो पसार होता.

सदरबाबत पोलीस उप-आयुक्त साो, श्री. आर राजा परिमंडळ ५. पुणे शहर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेवुन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांनी तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांच्या चार टिम तयार करुन आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी व स्टाफ आरोपीचा शोध घेत होते. गुन्ह्याचे तपासा दरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार हा सदर आरोपीचा शोध घेत होते. गुन्ह्याचे तपासा दरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार शाहिद शेख व लक्ष्मण होळकर यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचे सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन आरोपीने गुन्हा करताना वापरलेली मोटर सायकल व त्यावरील अर्धवट नंबर प्राप्त केला.

Advertisement

सदर प्राप्त अर्धवट नंबरचे सहाय्याने विविध सिरीजच्या सुमारे १६ मोटर सायकलींची पडताळणी केली. तेव्हा सदर पडताळणी दरम्यान आरोपीने वापरलेली मोटर सायकल व त्यावरील आरोपीची चेहरेपट्टी ही एका मोटर सायकलस्वाराशी मिळती जुळती असल्याने त्यास त्याचे कामाचे ठिकाणी न-हे, कात्रज या ठिकाणाहून ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव नितीन मारुती ननावरे वय ४५ वर्षे, धंदा नोकरी, रा. पांचाळ वस्ती, तीन हत्ती चौक, धनकवडी, पुणे असे असल्याचे सांगितले. तसेच त्याने गुन्हा करणेसाठी येताना व जाताना वापरलेली मोटर सायकल नं. एम.एच.१२/एफ.डब्ल्यु./३५०८ ही देखील त्याचे ताब्यात मिळून आलेली आहे. त्यानंतर त्यास पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे तपास करीत असताना त्याचेवर यापुर्वी देखील खालीलप्रमाणे विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याचे समजले.

१. स्वारगेट पो.स्टे. गु.रजि.नं. ७०५/२००७ मा.दं. वि. कलम ३६३,३६६ (ए), ३५४
२. स्वारगेट पो.स्टे. गु.रजि. नं. ७४९/२००७ भा.दं. वि. कलम ३६३.३६६,३५४
३. सहकारनगर पो.स्टे. गु.रजि. नं. २७८/२०११ भा.दं.वि.कलम ३६३,३५४
४. भारती विद्यापीठ पो.स्टे. गु.रजि.नं. १५४/२०१२ मा.दं.वि.कलम ३६३.३६६ (२), ३५४
५. बिबवेवाडी पो.स्टे. गु. रजि. नं. ५३/२०१३ भा.दं. वि. कलम ३६३.३६६ (९),३५४,३४१,५०६
६. सहकारनगर पो.स्टे. गु.रजि.नं. १९९/२०१३ भा.दं. वि. कलम ३६३,३६६ (ए),३७६,५०६ (२) सदर गुन्ह्यामध्ये आरोपीने १० वर्षे शिक्षा भोगलेली आहे.
अशा त-हेने लहान बालकांची व महिलांचे विनयभंग करणा-या सराईत आरोपीस कोंढवा पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने जेरबंद केले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, श्री. आर. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. शाहुराव साळवे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन श्री. संतोष सोनवणे, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संदीप भोसले व श्री. संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येशील तपास पथकाचे सपोनि दिनेशकुमार पाटील, सपोनि लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, सागर भोसले, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजीत मदन, या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!