आया राखी का त्योहार, छाई खुशियों की बहार !! रेशम की डोरी से बांधा एक बहन ने अपनी भाई की कलाई पर प्यार।
पंकेश जाधव संपादक 7020794626
नागपूर मध्यवर्ती कारागृह,नागपूर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन नागपूर :- मा.श्री. प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्रीमती स्वाती साठे,कारागृह उपमहानिरीक्षक, पूर्व विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी एका नागपूर मध्यवर्ती कारगृह,नागपूर येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कारागृहातील बंदयांना भारतीय सांस्कृतिक सणाच्या दिवशी आपल्या बहिणीची आठवण येत आसते त्यावर मायेची फुंकर घाल्याचे काम रक्षाबंधन सारखे सण एक माध्यामाचे काम कारागृहात करत असते.
मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमनिरीक्षक,पूर्व विभाग यांनी दिनांक 15.07.2024 रोजी एक परिपत्रक निर्गमीत केले आहे.यामध्ये त्यांनी काही सामाजिक संस्था कडून संक्रात, रक्षाबंधन, नाताळ इत्यादी सणानिमीत्त बंदयांचे सुधारणा व पुनर्वसनाकरीता तसेच आपण समाजाचा एक भाग आहोत याची जाणीव बंदयांना राहण्याकरीता सामाजिक कार्यक्रम कारागृहात घेतले जातात असे नमूद केले व स्थानिक पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनाची परवानगी दिलेली आहे. त्याअंतर्गत रक्षा बंधन निमित्ताने बंदी बांधवांना राखी बांधायचे कार्यक्रम नागपूर हाउसेस ऑफ मेरी इम्माकुलेट, संस्था, नागपूर यां संस्थेच्या अध्याक्षा सिस्टर वनीता जॉन, सिस्टर मेरी, मुख्याध्यापीका, प्रोव्हीडन्स स्कूल,नागपूर, सिस्टर मनीषा मुख्याध्यापीका, प्रोव्हीडन्स स्कूल,नागपूर, तसेच इतर संस्थेच्या सदस्या उपस्थीत होत्या. सदर कार्यक्रमामध्ये एकूण 450 शिक्षा बंदयांना तसेच कारागृहातील कारखाना विभागाततील सर्व विभागात जावून सर्व बंदयांना राखी बांधण्यात आली.
या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक श्री.वैभव सु.आगे, अती.अधीक्षक श्रीमती दीपा वै.आगे, वरिष्ठ तुंरूंगाधिकारी श्री. आनंद पानसरे, कारागृह शिक्षक, लक्ष्मण साळवे, प्रयास सामाजिक संस्था, मुंबई या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते श्री.धनपाल मेश्राम, श्रीमती मीना लाटकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

