येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्यांसाठी राखी बांधण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्यांसाठी विविध सेवाभावी संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, मनोरंनात्मक, समुपदेशपर असे प्रशंसनिय उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार आज दि.१९.०८.२०२४ रोजी रक्षाबंधन “सणानिमित्त विविध सामाजिक संस्थेमार्फत बंद्यांना राखी बांधण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या मध्ये श्री शिवसमर्थ भगवान अग्रेसन गोशाळा फाउंडेशन पुणे, समर्थ प्रतिष्ठान पुणे, आम्ही शाश्वत आणि सक्षम संस्था पुणे या संस्थेमार्फत कारागृहातील बंद्यांना राखी बांधण्यात आली. रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणींच्या नात्यांचा उत्सव आहे. कारागृहातील चार भिंतीच्या आत बंदीस्त बंदीजनांनी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात यावा या उद्देशाने सदर उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल.सदर कार्यक्रम मा. प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा.डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतुन व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे श्रीमती. पी पी कदम, अति. अधीक्षक, श्री. आर. ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, यांनी कामकाज पाहीले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

