ज्येष्ठ महिलांचे सोन्याच्या बांगड्या कट करुन चोरी करणारे सराईत महिला जेरबंद त्यांचेकडुन ०७,६७,०००/- रु किचे एकुण १३ तोळे सोने जप्त.
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :-मा. वरिष्ठ अधिकारी यांनी पीएमपी बस मधील चोरीचे प्रकाराला आळा घालण्यासाठी चोरी करणारे महिला यांची माहिती काढुन त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्याकरीता आदेश दिले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट-१ श्री. शब्बीर सैय्यद यांनी योग्य ते मार्गदर्शन करुन नमुद गुन्हयाबाबतची माहिती दिनांक २०/०१/२०२४ रोजी सहा. पोलीस निरीक्षक, कवठेकर, सहा. पोलीस फौज राहुल मखरे, पोलीस अंमलदार, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अय्याज दड्डीकर, अभिनव लडकत, महिला पोलीस अंमलदार, रुक्साना नदाफ असे युनिट १ कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार, अनिकेत बाबर यांना बातमीदारा मार्फत बालमी मिळाली की, पीएमपी बस मध्ये चढत असताना महिलांचे हातातील बांगडी कट करुन चोरी करणा या दोन महिला आत्ता सध्या पुणे मनपा रोडवरील वडगाव शेरी येथील बस स्टॉप जवळ थांबलेल्या असुन, सध्या ते कोणतातरी गुन्हा करण्याचे इराद्याने थांबलेले आहेत. सदर बातमी प्रमाणे महिला नामे १) सुरेखा ऊर्फ नग्गी छोटु जाधव, वय-३४ वर्षे, रा.स.नं.३६, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे २) शितल ज्ञानेश्वर गायकवाड, वय-३३ वर्षे, रा. स.नं.३६, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे यांना ताब्यात घेवुन प्रथम त्यांचे अंगझडती मध्ये २०,०००/- रू किचे दोन मोबाईल फोन व २५/- रु किचे एक कटर हस्तगर करण्यात आले आहे. त्यांचेकडे तपास करता त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.र.नं.१९१/२०२३, भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांना मा. न्यायालयात हजर करुन त्यांची दिनांक २४/०१/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.
नमुद आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्यांना विश्वासात घेवुन तपास केला असता, त्यांनी संगनमत करुन बस मध्ये प्रवास करुन बस मधील ज्येष्ठ महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगडया / पाटल्या कटरने कट करुन चोरल्याचे उघडकीस आलेले असून त्यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणुन सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे.
०७,६७,०००/-
आरोपीचे ताब्यतुन ०२ मोबाईल फोन व एक कटर एकुण किंमत
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, (अति. कार्यभार), श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-०१, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. शब्बीर सय्यद, सहा. पोलीस निरीक्षक, आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अय्याज दड्डीकर, अजय थोरात, अभिनव लडकत, दत्ता सोनवणे महिला पोलीस अंमलदार रुक्साना नदाफ यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

