जेष्ठ महिलेची सोनसाखळी चोरणारा चैन स्नॅबर जेरबंद पर्वती पोलीसांची कामगिरी


पंकेश जाधव संपादक 7020794626

पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांकः- १०/०१/२०२४ रोजी सायंकाळी १७/३० वा. सुमारास पर्वती पोलीस स्टेशन हदीतील तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर पुणे येथे जेष्ठ महिला फिर्यादी या सायंकाळी रस्त्यावरून पायी फिरत असताना त्यांचे पाठीमागुन एक स्कुटर चालक आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचा नेकलेस हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन नेला होता, याबाबत पर्वती पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १७/२०२४ मा.द.वि कलम ३९२ असा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयांचा तपास करीत असताना नमुद भागातील उपलब्ध असलेले सी.सी.टी.व्हि. फुटेजेस् तपासण्यात आले तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सहकारनगर भागामध्ये येण्याचे व जाण्याचे व संशयीत ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील जवळपास ३०० ते ३५० सी.सी.टी.व्हि. फुटेज पाहत नारायण पेठ लक्ष्मीरोड पुणे पर्यंत पाहणी केली. यात्तील अज्ञात चैन स्नॅचरचा माग काढत असताना पोहवा प्रकाश मरगजे, पोलीस शिपाई अमित चिव्हे यांना दाखल गुन्हयांतील चैन स्नॅचर बाबत सी.सी.टी.व्हि. तपासणीत दाखल गुन्हयांतील आरोपी हा लक्ष्मी रोड येथे गाडीसह उभा आहे असे दिसुन आले. सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवल्याने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे तपास पथक स्टाफत्तह वरील ठिकाणी रवाना झाले. त्यांनी रस्त्यांवर सापळा लावुन अत्यंत शिताफीने आरोपीस पकडले. त्यांचेकडुन त्याने गुन्हयांत चोरलेले दोन तोळे वजानाधी सोन्याची चैन व दुचाकी असा १,३०,०००/-रु कि चा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. पकडलेल्या आरोपीचे नाव शशिकांत यशवंत पाटोळे वय-३२ वर्षे रा लेन नं १४, दत्तमंदीर जवळ जनता वसाहत, पर्वती पुणे ०९ असे आहे. आरोपीस अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने घडलेल्या गुन्हयाबाबत कबुली दिली असुन दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने सांगितले की, शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने त्याने चैन स्नॅचिंग केली आहे. त्यास नमुद गुन्हयात काल दि. १४/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आले असुन दाखल गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत कामठे हे करत आहेत.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त सो परि. ३ मा. श्री. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग मा. श्री. आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा. जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक (गुन्हे) मा. विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप- निरीक्षक चंद्रकांत कामठे, पो. हवा. प्रकाश मरगजे, अमित चिन्हे, अमोल दबडे, दयानंद तेलंगे- पाटील, प्रशांत शिवे, पुरुषोतम गुन्ला, सुर्या जाधव आणि सदाम शेख यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!