पुणे सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगीरी ! इझी पे कंपनीची साडे तीन कोटींची फसवणूक, एजंटच्या साथीदारंना परराज्यातून अटक


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पुण्यातील येरवडा येथील इझी पे प्रा. लि. कंपनीला  साडेतीन कोटी रुपयांचा गंडा  घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी  दोन एजंट यांना अटक केली होती. यानंतर त्यांच्या दोन साथीदारांचा माग काढून पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. आरोपींनी इझी पे कंपनीची 3 कोटी 52 लाख 70 हजार 210 रुपयांची आर्थिक फसवणूक  केली आहे. 

अंकित कुमार अशोक पांडे  (20, सध्या रा. सी/18, निबे दितो पार्क, ममरा, दुर्गापुर, बर्धमान, पश्चिम बंगाल. मुळ रा. महेश दिन गाव, काजीया, गोडापूर, नवादा, बिहार), छोटू उर्फ एजाज आलम जिआऊल अन्सारी वय-28 रा. कुरमेडी बाजार, सहजानंद शाळेजवळ, बालीडी, झारखंड, मूळ रा. रेगनीय पोस्ट झरी, थाना आसम, गया, बिहार) यांना यापूर्वीच अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.

Advertisement

गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून फरार आरोपींची माहिती व तपासात प्राप्त झालेली इतर माहितीच्या आधारे आरोपींचे तांत्रिक विश्लेषण केले. फरार आरोपी उबेद उर्फ उब्बेदुल्ला अन्सारी (वय-36 रा. आमस, गया, बिहार) व आयुब बशिर आलम (रा. रिगनिया, गया बिहार) यांचा शोध घेण्यासाठी एक पथक दिल्ली येथे पाठवण्यात आले. आरोपी त्यांचा राहण्याचा पत्ता वारंवार बदलत असल्याने ते पोलिसांना सापडत नव्हते. पथकाने आरोपींचा माग काढला असता ते दिल्ली येथून बिहार तिथून पश्चिम बंगाल येथे गेल्याचे समजले पथकाने पश्चिम बंगाल येथून आरोपींना सपाळा रचून अटक केली. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाली आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार , सह पोलिस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे ,आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख सहाय्यक पोलिस आयुक्त आर. एन. राजे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिनल सुपे-पाटील , पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले , पोलिस अंमलदार संदेश कर्णे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, शाहरुख शेख, निलेश लांडगे, नितीन चांदणे यांच्या पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!