परिसरातील चेष्टा मस्करीत गुदद्वाराला पाईप लावून गुदद्वारातून शरीरात भरली हवा, अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू….
वैशाली जाधव उप संपादक
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- फूड प्रोसेसिंग कंपनीत काम करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या गुदद्वाराला एअर कॉम्प् पाईप लावून त्याच्या अंगात हवा ‘भरली. या अघोरी कृत्यामुळे अल्पवयीन मुलाचा जागेवर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.4) सकाळी साडेदहा ते अकरा या दरम्यान हडपसर इंडस्ट्रीयल एरिया इस्टेट येथील पुना फ्लोअर अँड फुड्स या कंपनीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मोतीलाल साहू (वय-16) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी धीरजसिंग गोपालसिंग गौड (वय-21 रा. हडपसर इंडस्ट्रीयल एरिया इस्टेट, हडपसर) याच्यावर आयपीसी 304 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत शंकरदिन रामदिन साहू (वय 34, रा. मूळ बडागाव, मध्य प्रदेश) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पुना प्लोजर अँड फुड्स या कंपनी काम करतात. सोमवारी सकाळी आरोपी, फिर्यादी व त्यांचा गयत भाचा कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर काम करत होते. त्यावेळी चेष्टा मस्करीत आरोपीने कंपनीत साफसफाईसाठी वापरत असलेला हवेचा एअर कॉम्प्रेसरचा पाईप फिर्यादी
यांचा भाचा मोतीलाल याच्या गुदद्वाराला लावला. मोतीलाल याच्या पोटात भरली गेल्याने शरिरात गंभीर दुखापत होऊन मोतीलाल याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

