राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे यांची सोरतापवाडी/शिंदवणे व परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर धडक कारवाई.


पत्रकार विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण 

राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. अधीक्षक साहेब, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांचे आदेशानुसार दि. ०८/०३/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त खात्रीलायक बातमीनुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे या विभागाने गुन्हा अन्वेषण विशेष मोहीम राबवून सोरतापवाडी/शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे येथे अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर अचानक छापे घालून सदर कारवाई मध्ये रसायन ३५५० लि., गावठी हातभट्टी दारू ४५५ लि., व इतर अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण रु. १,०३,७००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत हातभट्टी निर्मिती करणाऱ्या ०२ अज्ञात इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांचा तपास निरीक्षक श्री. संजय कोल्हे, जी विभाग व दुय्यम निरीक्षक श्री. वी. जी. रेडेकर हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त श्री. धोमकर साहेब व अधीक्षक श्री. रजपूत साहेब तसेच उपअधीक्षक, श्री. शिंदे साहेब, श्री. पाटील साहेब, श्री. जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. संजय के. कोल्हे व दुय्यम निरीक्षक श्री. ए. ए. औटे, श्री. बी. जी. रेडेकर, यांनी केली आहे. सदर कारवाईत सर्वश्री सहा. दु. नि. श्री. मोडक आणि जवान श्री. अमोल कांबळे, श्री. संतोष गायकवाड, श्री. दत्तात्रय आबनावे व महिला जवान श्रीमती प्रिया चंदनशिवे तसेच विशेष भरारी पथक यांचे ०४ अधिकारी व ०२ जवान यांनी सहभाग घेतला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!