वयोवृध्द इसमास जिवे ठार मारण्याचा कट रचुन त्यांचे गळयावर चाकुने वार करून पसार झालेल्या आरोपीस केले जेरबंद


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१५/०६/२०२४ रोजी फिर्यादी यांना रांका ज्वेलर्स मागे प‌द्मावती पुणे यांना पुणे सातारा रोडवरील रांका ज्वेलर्स शेजारील फिश मार्केट समोरील फुटपाथवर प‌द्मावती पुणे येथे अनोळखी इसमाने चाकुने गळयावर वार करुन जखमी केल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.२१२/२०२४ भादवी कलम ३२४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

दाखल गुन्हयामध्ये अनोळखी आरोपीची कसलीही माहिती मिळत नव्हती. सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व तपास पथकाचे स्टाफला योग्य त्या सुचना देवुन तपासाबाबत मार्गदर्शन केले. तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठांचे सुचने प्रमाणे अनोळखी आरोपीचा माग काढुन शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे यांना बातमी मिळाली की, फिर्यादी यांना इसम नामे १) सागर सतीष कुंभार वय ४१ वर्ष, रा.सी/६/१ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे याने चाकुने मारुन जखमी केले असुन सध्या तो त्याचे घरी आहे. लागलीच पोउनि. पोठरे व तपास पथकाचे स्टाफने सागर कुंभार यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा इसम नामे तौरस कारले रा. बिबवेवाडी याचे सांगणेवरुन केला असल्याची कबुली देवुन त्यासाठी तौरस कारले याने ५०,०००/-रु.ची सुपारी दिल्याची कबुली दिली. सदरचा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याचे निदर्शनास आल्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सागर कुंभार याने दिलेल्या कबुलीवरुन तौरस कारले यास अप्पर डेपो येथुन ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा इसम नामे सागर सोनार रा. मोरे वस्ती रांका ज्वेलर्स मागे पुणे याचे सांगणेवरुन केला असल्याची कबुली देवुन त्यासाठी सागर सोनार याचेकडुन दोन लाख (२,००,०००/-) रु.ची सुपारी घेतल्याची कबुली दिली. इसम नामे तौरस कारले याचे कबुली वरुन सागर सोनार रा. मोरे वस्ती प‌द्मावती पुणे यास ताब्यात घेवुन तपास करता त्याने त्याचे शेजारी राहणारे फिर्यादी इसम हे करणी, भानामती सारखे प्रकार करुन त्रास देत असल्याने व आमचे घर बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याने सदरचे कृत्य केल्याचे तपासात सांगुन फिर्यादी यांना मारण्यासाठी तौरस कारले यास दोन लाख (२,००,०००/-) रु.ची सुपारी दिल्याची कबुली दिली.

Advertisement

 

दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) सागर सतीष कुंभार वय ४१ वर्ष, धंदा काही नाही रा.सी/६/१ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे २) तौरस बाळु कारले वय ४३ वर्षे धंदा नोकरी रा. बी/५९/१९ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे ३) सागर शशीकांत सोनार वय ३२ वर्षे धंदा नोकरी रा. मोरे वस्ती रांका ज्वेलर्स मागे प‌द्मावती पुणे यांचेकडे तपास करता त्यांनी कट कारस्थान रचुन संगनमताने सोनु होडे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असुन त्यासाठी आरोपी नामे सागर सोनार याने फिर्यादी नामे सोनु होडे यांना जिवे मारण्यासाठी दोन लाख (२,००,०००/-) रु.ची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात भादवि. कलम ३०७,१२० (ब), ३४ प्रमाणे कलमवाढ केली आहे. नमुद तीनही आरोपींना दाखल गुन्हयात अटक केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे हे करीत आहेत.

 

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रवीणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्रीमती नंदीनी वग्यानी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोलीस उप निरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, विनोद जाधव, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, अमित पदमाळे सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, खंडु शिंदे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!