दक्षिण अफ्रिकेत झळकले पुणे पोलीस दलाचे नाव


पंकेश जाधव सांपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- 95 वर्षांची परंपरा असलेली कॉग्रेड मॅरेथॉन हि आंतरराष्ट्रिय स्तरावर खडतर मानली जाणारी मॅरेथॉन स्पर्धा असुन दि.09/06/2024 रोजी डर्बन, साउथ अफ्रिका येथुन सुरु होउन पीटरमरिट्झबर्ग सिटी हॉल येथे शेवट झाली. सदरची मॅरेथॉन हि एकुण 86 किलो मीटरची अप हिल रन मॅरेथॉन होती व त्यात पाच टेकड्यांना ओलांडुन ।। तास 59 मिनिट 59 सेकंद मध्ये मॅरेथॉन पुर्ण करणे आवश्यक होते.

Advertisement

 

पुणे पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर विश्रामबाग विभाग या ठिकाणी कार्यरत असणारे साईनाथ ठोंबरे यांनी वयाच्या 55 व्या वर्षी सदरची खडतर मॅरेथॉन 11 तास 48 मिनीटा मध्ये पुर्ण करुन पुणे पोलीस दलाचे व देशाचे नाव उंच केले आहे. पोलीस दलाच्या अतिशय व्यस्त कामातुन देखिल वेळ काढून सतत दिवस-रात्र सराव करत या मॅरेथॉनची तयारी त्यांनी केली. पोलीस दलात तसेच सामाजिक क्षेत्रातून देखील सदरच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन व शहरातील नागरीका मार्फत सहा.पो. आयुक्त साईनाथ ठोंबरे यांचा मा. पोलीस उप आयुक्त संदिप गिल यांच्या हस्ते जाहीर सत्कार करुन कामगीरीचे कौतुक केले गेले.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!