जागतिक योग दिन येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे साजरा करण्यात आला
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- जागतिक योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योग हा व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार आहे, ज्याच्या माध्यमातुन केवळ शरीराच्या विविध अवयांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. कारागृहाच्या आत चारभिंतीमध्ये बंदी जनांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जिवन जगण्यासाठी योग अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग. त्यानुसार जागतिक योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांचेमार्फत दि.२१.०६.२०२४ रोजी येरवडा मध्यवतों कारागृहात बंद्यांसाठी योग दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला कारागृहामध्ये कैवल्यधाम, स्वामी केवल्यानंद मार्ग लोणवळा, पुणे यांचेमार्फत महिला बंद्यांसाठी योग दिनानिमित्त योग शिविर आयोजित करण्यात आले.
योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातुन डॉ. श्री. अंजिक्य पवार, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान यांनी योगातील विविध आसनांमधुन मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते, तसेच योगाभ्यासातुन बौध्दिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो याबाबत महत्व विषद केले.
सदर उपक्रम मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, श्री. निखिल देशमुख, उपसंचालक, केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे, सी. बी. सी. पुणे विभागीय कलाकार, डॉ. जे. वी. पानपाटील, व्यवस्थापक, सीबीसी पुणे, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, श्रीमती. पी. पी. कदम उपअधीक्षक, श्री. पी. बी. भुसारे, उपअधीक्षक, श्री. एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्री. आर ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. व्ही. के. खराडे, सुभेदार यांनी कामकाज पाहीले.
Cheif Editor : Pankesh jadhav