अवैद्य रित्या गांज्या विक्री करणा-या ०२ महिला खडकी पोलीस स्टेशनकडुन जेरबंद २,२१,१३०/- रु मुद्देमाल हस्तगत.


पंकेश जाधव संपादक 7020794626

खडकी पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अंमली पदार्थ मुक्त पुणे अभियानाच्या अनुषंगाने दि.०८/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी कारवाई व अवैद्य धंदे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी १७/३० वा. चे सुमारास तपास पथकाचे अधिकारी पो.उप.नि. गुंजाळ, तपास पथकातील अंमलदार भोसले यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही महीला व पुरुष असे मिळून पाटील ईरटेट ब्रिजखाली, हॉटेल अलकुरेश जवळ, शिवाजीनगर, पुणे येथे गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे.

वगैरे मजकुराची खबर मिळाल्याने लागलीच सदरबाबत मा. वरिष्ठांना अवगत करुन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ, पो. निरी. गिरीशकुमार दिघावकर व म. सहा. पो. निरी. श्वेता बेल्हेकर, पोलिस अमंलदार निकाळजे, म.पो. अमंलदार शिंदे, म्हरके व तपासपथक स्टाफ असे बातमी प्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत रवाना होवुन पाटील ईस्टेट ब्रिजखाली, हॉटेल कुरेश हॉटेलजवळ, गल्ली नं. ८ शिवाजीनगर, पुणे येथे मिळाले बातमी प्रमाणे दोन महिला व दोन पुरुष हातामध्ये पांढरे व निळे रंगाचे पिशव्या घेवुन उभ्या असल्याचे दिसल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने म.स.पो. नि. बेल्हेकर यांनी सदर दोन महिलांना हटकवुन जागीच अटकाव केला. आम्हा पोलीस स्टाफची चाहुल लागताच त्यांचेसोबत असणारे दोन पुरुष तेथुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. सदर महिलांना त्याचे नाव व पत्ता विचारता त्यांचे नाव अनुक्रमे, १) झेनब कंबर इराणी, वय ४० वर्षे, रा. महात्मा गांधी वसाहत, खडकी, पुणे, २) मोसीना नादर इराणी, वय ३२ वर्षे, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर महिलांची झडती घेतला त्यांचेकडुन अनुक्रमे, १) ९२,०००/-एक पांढरे रंगाची पिशवी त्यामध्ये गांजा हा अमली पदार्थ, त्याचे वजन २ किलो ३०० ग्रॅम किं.अं. व रोख रक्कम व इतर साहीत्य व २) ९६,०००/-एक निळे रंगाची पिशवी त्यामध्ये सर्व गांजा हा अमली पदार्थ, त्याचे वजन २ किलो, ६०० ग्रॅम किं.अं.व इतर साहीत्य असे एकुण २,२१,१३०/- वजनाचा व किंमतीवा गांजा तसेच चिलीम, रोख रक्कम, मोबाईल फोन, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

Advertisement

सदरबाबत आरोपीत नामे, १) झेनब कंबर इराणी, वय ४० वर्षे, रा. महात्मा गांधी वसाहत, खडकी, पुणे, २) मोसीना नादर इराणी, वय ३२ वर्षे, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे, व दोन इसम यांचे विरुध्द खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ६६/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब), II (ब) अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्ह्याचा तपास म. सहा पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०४, पुणे शहर श्री. विजयकुमार मगर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्रीमती आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पो.स्टे. श्री. गिरीशकुमार दिघावकर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्वेता बेल्हेकर, सहा पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे, पोलीस उप निरीक्षक, आण्णा गुंजाळ, पोलिस अमंलदार निकाळजे, कलंदर, अतुल इंगळे, अनिकेत भोसले, म.पो. अमंलदार शिंदे, म्हस्के यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!