शिवाजीनगर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी !लॅपटॉप चोरी करुन पसार झालेल्या संगणक अभियंत्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाकडून अटक.


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :– फिर्यादी यांनी त्यांचे संगणक विक्री व दुरुस्ती चे दुकानात हार्डवेअर इंजिनिअर समीर रामनाथ थोरात वय ३९ वर्षे यास सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान नोकरीस ठेवले होते. फिर्यादी हे दुबई येथे गेलेले असल्याचा गैरफायदा घेवुन दुकानातील ४ लॅपटॉप व इतर साहीत्य तसेच ग्राहकांकडून कॉम्प्युटरचे साहीत्य असे परस्पर घेवून पसार झाल्याने, अपहार करुन फसवणुक केली आहे म्हणून फियांदीने त्याचे विरोधात कायदेशीर तक्रार दिल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुरनं-४५/२०२४ भादवि ४२०,४०८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

मा.श्री. संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ०१ यांनी वरील गुन्ह्यातील पसार आरोपीचा शोध घेवुन कारवाई करण्याच्या सुचना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकास दिल्या. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सपोनि बाजीराव नाईक व पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी नमुद आरोपीस कुशलतेने यशस्वी सापळा रचुन, अहमदनगर व छ. संभाजीनगर जिल्हा येथे शोध घेवुन, आरोपीस दिनांक ०८/०३/२०२४ रोजी अटक करुन, त्याला विश्वासात घेवुन चौकशी करुन, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडुन गुन्ह्यातील १,४०,०००/- रुपये किंमतीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेले आहेत. नमूद आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, मा. साईनाथ ठोंबरे, सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वाखाली सहा पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!