लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन फसवणा-या भामट्याला कोंढवा पोलीसांनी केले अटक”


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- लष्कराच्या सदन कंमान्ड येथे ड्रायव्हर म्हणुन नोकरी करणा-या व पुर्वी लष्करात नोकरी लावुन देण्याच्या आमिषाने पैसे घेवुन बनावट अपॉयमेन्ट लेटर देवुन फसवणुक करणा-या गणेश बाबुलाल परदेशी याने पुन्हा कोंढवा भागातील रामदास माणिकराव देवर्षे यांच्या मुलीना तसेच त्याच्या इतर नातेवाईकांना त्याची लष्करातील बडया अधिका-याशी ओळख असल्याचे सांगुण लष्करात सिव्हिलियन यापदावर नोकरीला लावतो म्हणुन ८,३२,०००/-रु घेवुन नोकरी न लावता फसवणुक केली होती. त्याबाबत कोंढवा पो ठाणे येथे गुरन.११८९/२०२४, मा.दं. वि. कलम ४०६,४२०,४६४ (अ),४६५,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

गुन्हा केल्यानंतर आरोपी याने त्याचा रहाता पत्ता बदलुन दुस-या ठिकाणी राहण्यास जावुन मोबाईल नंबर बदलेले होते. सदर आरोपी यांचा शोध घेण्याबाबत कोंढवा तपास पथकातील श्री लेखाजी शिंदे सहा पोलीस निरीक्षक व त्याचे पथक मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना दि.०८/०३/२०२४ रोजी तपास पथकातील श्री लेखाजी शिंदे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार विकास मरगळे, शंशाक खाडे यांना माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा एन.आय. बी. एम. रोड सांळुखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर येथे ओळख लपवुन तोडाला रुमाला बांधुन सामान घेण्यासाठी आला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकातील स्टाफसह एन.आय.बी. एम. रोड सांळुखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर जवळ गेलो असता गणेश बाबुलाल परदेशी हा स्टेशनरी दुकानातुन सामान खरेदी करुन निघुन चालला होता. त्याच्याकडे बातमीदाराने अंगुली निर्देश करुन सुचित केले असता त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता गणेश बाबुलाल परदेशी राहणार कृष्ण केवल सोसायटी, एन आय बी एम रोड कोंढवा खुर्द पुणे असे सांगितले. त्यास पोलीस ठाणे येथे आणुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर आरोपी याने आणखीन तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेवुन नोकरीचे आमिष दाखवुन फसविले असल्याबाबत माहिती प्राप्त होत असुन त्याबाबत अधिक तपास वैभव सोनवणे सहा पोलीस निरीक्षक हे करित आहे.

सदर कामगिरी मा. अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो परि.०५, मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, स.पो.नि. पो.हवा. अमोल हिरवे, पो हवा राहुल वंजारी, पो.शि. अभिजीत रत्नपारखी, पो शि शशांक खाडे पो.शि. विकास मरगळे, पो. शि. राहुल थोरात, पो.शि. सुहास मोरे, पो. शि. जयदेव भोसले, पो.शि. अभिजीत जाधव, पो.शि. आशिष गरुड, पो.शि. रोहित पाटील, पो शि अक्षय शेंडगे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!