स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये प्रवाशांना जबरदस्तीने लुटुन जबरी चोरी करणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीस स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस  न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ४२७/२०२४ भा. न्या. सं २०२३ चे कलम ३०९ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी हे स्वारगेट येथील कात्रज बिबवेवाडी पीएमपीएमएल बस स्टॅण्डच्या समोरुन दिनांक २७/०९/२०२४ रोजी २१/३० वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी पुणे येथील राहते घरी जाण्याकरीता पॅसेंजर रिक्षामध्ये बसले असता सदर रिक्षा चालकाने फोन करायचा आहे असे बहाना करुन फिर्यादी यांचा चालत्या रिक्षात मोबाईल काढुन घेवुन पर्वती इंडस्ट्रीजजवळील पीएमपीएल बस स्टॉप जवळील सार्वजनिक शौचालय जवळ त्यानंतर स्वामी विवेकानंद रोडने गंगाधाम चौकामार्गे लुल्लानगर परीसारात रिक्षा फिरवुन फिर्यादी कडील रोख रक्कम ५०० रुपये काढून फिर्यादीचे नातेवाईकांकडुन फिर्यादीचे मोबाईलवर ऑनलाईन ४०००/- रुपये रक्कम मागवुन घेवुन फिर्यादीचे गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल जबरदस्तीने काढून घेवुन सदर मोबाईलचा पासवर्ड (गगुल पे) विचारुन घेवुन धक्का बुक्की व धमकावुन फिर्यादीस लुल्लानगर ब्रिजजवळ कोंढवा पुणे येथे सोडुन रिक्षामधुन पळुन गेले होते त्यावरुन फिर्यादी यांनी सदर रिक्षा चालक व त्यांचे तीन साथीदार यांचेविरुद्ध तक्रार दिल्याने वर नमुद गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत मा. युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते. त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोउपनिरी रविंद्र कस्पटे, तपास पथकातील पोलीस हवालदार २६८४ मोराळे, पो/अं ८२३७ टोणपे पोलीस हवा ६५४४ तनपुरे पो/अं ७८९९ शिंदे शिपाई १००५७ पवार यांनी गुन्हयाचे अनुषंगाने १०० ते १५० सीसीटिव्ही फुटेज तपासले असता गुन्हा रात्रीच्या वेळी घडला असल्याने काहीएक उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती. तद्नंतर तांत्रिक विश्लेषनाद्वारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी नामे रोहीत सुभाष चव्हाण वय २३ वर्षे धंदा रिक्षा चालक रा- गंगानगर लेन नं ७ भेकराईनगर फुरसुंगी हडपसर पुणे हा त्याचे राहते घराचे परिसरात मिळुन आल्याने त्यास त्याने गुन्हयात वापरलेल्या रिक्षासह ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करुन तिचे इतर साथीदार नामे १) मयुर ऊर्फ संकेत प्रकाश चव्हाण वय १९ वर्षे धंदा नोकरी रा. सरवदे यांच्या चाळीत रुम नं ३ गल्ली नं ३ एच पी पेट्रोलपंपाजवळ मंतरवाडी देवाची उरुळी ता हवेली जि पुणे २) सुदर्शन शिवाजी कांबळे वय २२ वर्षे रा. म्हाडा कॉलनी डी/२०७ आर एम डी कॉलजेशेजारी वारजे माळवाडी पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांनी दाखल गुन्हयतील चोरी केलेला माल व गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकुण ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे हे करीत आहेत. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेशकुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा सो, सह-आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. प्रविण कुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २ पुणे शहर, मा. नंदिनी वग्यानी सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. युवराज नांद्रे सो, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस हवालदार २६८४ मोराळे, पोलीस हवालदार ६५४४ तनपुरे, पोलीस अंमलदार ७८९९ शिंदे, पो/अं ८२३७ टोणपे, पो/अं ९९६३ खेंदाड, पो/अं १००६२ शेख, पो/अं १००५७ पवार, पो/अं १०१४७ घुले, पो/अं १००६८ चव्हाण व पो/अं २१९० दुधे पोलीस यांनी एकत्र मिळुन केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!