गुन्हे शाखा युनिट ४ ची दमदार कामगिरी ! दोन वर्षाकरिता तडीपार असलेल्या आरोपी ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. 08/09/2023 रोजी युनिट 4 चे पथक विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, तडीपार इसम नामे सनी अँडी हा विश्रांतवाडी खदानी जवळ उभा आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने तडीपार इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव *सनी अँडी वय 30 वर्ष रा. आनंद पार्क विश्रांतवाडी पुणे* असे असल्याचे सांगितले. लागलीच विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून त्याबाबत माहिती घेतली असता तो पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षां करिता तडीपार असल्याबाबत माहिती मिळाली.
सदर आरोपी विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २८९/२०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई कामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

