काळेवाडी फाटा येथे १ मे रोजी सराईताचा खून करून पसार झालेले आरोपी, पिंपरी चिंचवड अमली विरोधी पथकाच्या जाळ्यात


पंकेश जाधव संपादक 702079462
अंमली पदार्थ विरोध पथक पिंपरी चिंचवड शहर 
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:- मयत रिहान याने काही दिवसांपूर्वी आरोपी प्रेम मोरे याच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता.
२मे रोजी सायंकाळी रिहान हा सांगवीतून जाताना आरोपींना दिसला. आरोपी ऋतिक चव्हाण, प्रेम मोरे, त्याचा मित्र दिपक कोकाटे आणि दिपकचा मित्र कार्तिक यांनी त्याचा पाठलाग केला. काळेवाडी फाट्याजवळ असलेल्या पुलावर त्याला अडवून आरोपी ऋतिक चव्हाण याने चाकूने व इतर आरोपींनी लाथा बुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून रिहान याचा खून केला. गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त संदीप डोईफोडे यांनी माहिती दिली.
ही घटना बुधवारी (दि.१) सायंकाळी काळेवाडी फाटा येथे घडली होती. यातील तीन आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
ऋतिक दिलीप चव्हाण (वय २१, रा. महादेव आळी, जुनी सांगवी), प्रेम्या उर्फ प्रेम प्रकाश मोरे (वय १८, रा. शितळानगर, जुनी सांगवी) आणि दीपक कोकाटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रिहान शेख (रा. जुनी सांगवी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार प्रसाद कलाटे व विजय दौंडकर यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार निगडी जकात नाक्याजवळून आरोपी ऋतिक चव्हाण, प्रेम मोरे, दीपक कोकाटे यांना अटक केली. तर चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!