फरासखाना पोलीस स्टेशन कडुन १३ लाख ४९ हजार रूपयेचा, २१ तोळे, सोन्याचा चोरीचा मुदेमाल ३ आरोपीसह जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू त्रिशूल हॉलमार्किंग सेंटर गणेशपेठ येथे दि.०१/०५/२०२४ रोजी पहाटे ०५/३० वा दूकानातील हॉलमार्किंग साठी वेगवेगळया दुकानातून आलेल्या सोन्यातील २१ तोळे सोने एकूण किमंत १३ लाख ४९ हजार ६३४ रुपये चा मुदेगाल चोरीला गेल्याची माहीती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे यांनी गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले.सी सी टी व्ही फुटेज व इत्तर तात्रिक तपास केला असता आरोपी हे माळशिरस भागात असल्याचे कळल्यावर तात्काळ तपास टिम माळशिरस भागात पाठविली त्यामध्ये पोलीस उपनिरिक्षक अरविंद शिंदे व पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोहवा सफौ. मोकाशी, पोशि मुलाणी हे माळशिरस भागात आरोपीचा शोध घेतला व अवघ्या १२ तासात गुन्हयातील चोरीचा छडा लावला व आरोपीकडून चोरीला गेलेला २१ तोळे सोने एकूण किमंत १३ लाख ४९ हजार ६३४ रुपये चा मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेउन सदर गुन्हयात आरोपीस अटक करून गुदमाल रिकव्हर केला आहे. यामध्ये फिर्यादी यांचे दुकानात काम करणारे कामगार यांनी दागिने चोरीचा प्लॅन तयार केला संगणमत करून सध्या कामावरील कामगार १. लकी दत्तात्रय गोहीते, वय-१९ वर्षे, रा- रेताळ बस चौक, सोनीरा साखर कारखाना रोड, वांगी, सांगली यांने यापुर्वी याच दुकानात काम केलेले कामगार २. सचिन मोहन दडस, वय-२४ वर्षे, मु. पो. उवरगाव, ता-आटपाडी, जि-सांगली ३. विशाल भागवत गोसावी, वय-३१ वर्षे, रा- मु.पो सराटी, ता-इंदापुर, जि-पुणे तसेच त्यांचे मित्र ४. अतुल दत्तात्रय क्षीरसागर वय २९ वर्ष रा. माळीनगर जि सोलापूर ५. सुरज भगवान महाजन वय २७ वर्ष रा. सग्रांमनगर ता माळशिरस जि सोलापूर या पाच आरोपीनी मिळून गुन्हा केल्याचे निष्पण झाले आहे. मा. न्यायालयाने त्यांना ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार सोो. मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार सोो. मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सोा., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे संदीपसिंह गिल. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्रीमती रुक्मिणी गलंडे यांचेचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रशांत भस्मे, पोलीस उपनिरिक्षक अरविंद शिंदे व पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोहवा सफौ. मोकाशी, पोहवा प्रविण पासलकर, पोशि गौस मुलाणी यांच्या टिमने केला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे हे करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

