गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगारास २ पिस्टल व ६ काडतुसे असा एकुण ८६,०००/-रु.किं. चा मुद्देमालासहीत केले जेरबंद
इरफान शेख पुणे जिल्हा प्रतिनिधी 8888429429
युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१३/१२/२०२४ रोजी युनिट २ चे हददीमध्ये युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार व संजय जाधव यांना बातमी मिळाली की दरी पुल आंबेगाव कात्रज पुणे येथे एक इसम अग्निशस्त्र घेवुन थांबला असलेची माहिती दिली.
त्याप्रमाणे युनिट २ पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांचे मार्गदर्शनखाली युनिट २ कडील सपोनि आशिष कवठेकर व त्यांचे सोबत असलेल्या पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे दरी पुल आंबेगाव बुगा ता. हवेली जि.पुणे या ठिकाणी सापळा रचून येथून सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव निलेश ज्ञानेश्वर भरम वय ३५ वर्ष रा. साई सिध्दी चौक वैष्णवी प्रेस्टीज २०३ आंबेगाव बुगा ता. हवेली जि पुणे असे असल्याचे सांगीतले. संबंधित आरोपी हा कुख्यात गुंड रवी पुजारी याच्या टोळीतील आहे असे निष्पन्न झाले आहे,त्यानंतर त्याचे अंगझडतीमध्ये ८६,०००/-रु. किं.चे २ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे मिळुन आले. त्याबाबत आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे येथे १०५३/२०२४ आर्म अॅक्ट ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हेगारावर हा यापुर्वी भारती विदयापीठ, सहकारनगर, स्वारगेट, कोंढवा, खडक, बिबवेवाडी, हवेली व पनवले येथे खुनाचा प्रयत्न, फायरिंग, दरोडा, दरोडा प्रयत्न खंडणी या सारखे एकुण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर सपोनि अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, निखिल जाधव, विजय पवार, नागनाथ राख, विनोद चव्हाण राहुल शिंदे अमोल सरडे, संजय आबनावे, प्रमोद कोकणे, व पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

