पुण्यातील उरुळी कांचन येथे खुलेआम गुटखा विक्री सुरू! अवैध व्यवसायांना मिळतेय अभय…


पत्रकार :- विशाल धाकतोडे

महा पोलिस न्यूज़ ऑनलाईन पुणे :- महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने दहा वर्षांपूर्वी लागू केला आहे. उरुळी कांचन परीसरातील साखरे पेट्रोल पंपा शेजारी गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. बंदी लागू झाली तेव्हा छुप्या मार्गाने होणारी गुटखा विक्री आता तर खुलेआम होत आहे. उरुळी कांचन चौकांमधील हॅाटेल बाहेरील पान टपऱ्यांचा धंदा तेजीत आला असून, यांना उरुळी कांचन पोलीसांच्या खाकीचा धाक राहिला नसल्याची वास्तव चित्र येथे खुलआम पाहण्यास मिळत आहे.

Advertisement

उरुळी कांचन परिसरातील बहुतांश पानटपरी आणि किराणा दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे. परराज्यातील नागरिकांची या व्यवसायातील संख्या लक्षणीय आहे. कायम गर्दी असल्यामुळे येथे गुटखा विक्रीची उलाढाल जास्त प्रमाणात होते. आधी गुटखा विक्री करणारे किरकोळ व्यावसायिक या धंद्यात तरबेज झाल्याने गब्बर झाले आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!