काळेपडळ पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार शाहरुख ऊर्फ अटटी रहीम शेख सोलापूर येथे चकमकीत ठार …
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळी प्रमुख रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण रा. सय्यद नगर, महमंदवाडी पुणे याने त्याचे टोळीतील सदस्य यांचेसह फिर्यादी यांची हडपसर पुणे येथील सर्व्हे नं. ७५/६ मधील १२९० स्क्रे फुट मिळकत ही इजाज सत्तार पठाण याचे नावावर असल्याचे सांगुन सदर मिळकतीवर फिर्यादी यांनी बांधलेले पत्र्याचे शेड काढुन उचकटून त्या ठिकाणी टिपू सत्तार पठाण याने त्याचा नावाचा बोर्ड लावुन सदरची जागा परत घेणेसाठी २० लाख रुपयेची मागणी करुन मिळकतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. म्हणुन टोळी प्रमुख रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण व त्याचे टोळीतील ७ ते ८ सदस्यांवर काळेपडळ पोलीस स्टेशन गु.र.नं.१००/२०२५ भा.न्या. सं. क. ३०८(२), ३२९(३), ३५१ (२),३५२, १८९(२), १९१ (२), ६१ (२),१११सह महाराष्ट्र संघाटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (II) ३(२), ३(४), २३(१) (अ) अन्वये दाखल आहे.
सदर गुन्हयामध्ये टोळी प्रमुख १) रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण व याचे टोळीतील सदस्य २) इजाज सत्तार पठाण रा. सय्यद नगर पुणे, ३) नदीम बाबर खान रा. सय्य्यद नगर, पुणे, ४) सदाम सलीम पठाण रा. सय्यदनगर पुणे, ५) इजाज युसुफ इनामदार रा. सय्यदनगर, पुणे, ६) साजीद झिबराईल नदाफ रा. वेताळबाबा वसाहत हडपसर पुणे, ७) इरफान नासीर शेख रा. सय्यदनगर हडपसर पुणे, ८) जैद सलीम बागवान रा. काळेपडळ हडपसर पुणे, ९) अजीम ऊर्फ अंटया महमंद हुसेन शेख रा. सय्यदनगर, पुणे यांना अटक करण्यात आली आहे व इतर ८ हे पाहिजे आरोपी होते.
त्यानुसार सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे शाहरुख ऊर्फ अटटी रहीम शेख रा. सय्यदनगर हडपसर पुणे याचा शोध घेत असताना तो राजु अहमंद शेख रा. लाबोटी ता. मोहोळ, जि. सोलापूर याचे घरी राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. पाहिजे आरोपी शाहरुख ऊर्फ अटटी रहीम शेख याचेवर पुणे शहरात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, ऑर्म अॅक्ट प्रमाणे गंभीर स्वरुपाची एकुण १५ गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापुर्वी ही महाराष्ट्र संघाटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलमान्वये वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. नं. २००/२०२१ अन्वये दाखल आहे.
सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार विनोद शिवले, अमित कांबळे, अकबर शेख यांनी पाहिजे आरोपी शाहरुख ऊर्फ अटटी रहीम शेख याचा लांबोटी ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे जावुन शोध घेणेकामी मोहोळ पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार यांना सोबत घेतले. पाहिजे आरोपी शाहरुख ऊर्फ अटटी रहीम शेख याचेबाबत माहिती प्राप्त झाली त्यानुसार राजु अहमंद शेख याचे राहते घरी गेले. त्यावेळी राजु अहमंद शेख याचे घरातील महिलेच्या मदतीने पाहिजे आरोपी शाहरुख शेख हा राहत असलेल्या वरच्या मजल्यावरील रुमचा दरवाजा वाजवला असता आतील बाजुने पाहिजे आरोपीची पत्नी हिने दरवाजा उघडला. त्यावेळी सपोनि मदन कांबळे यांनी त्यांना आम्ही पोलीस असुन शाहरुख हा काळेपडळ पोलीस स्टेशनच्या खंडणी सह मोक्याच्या गुन्हयात आरोपी आहे. सपोनि कांबळे यांनी त्यास पकडण्यास आलो आहोत असे सांगता तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख ऊर्फ अटटी रहीम शेख याने त्याचेकडील गावठी बनावटीचे पिस्टल सपोनि कांबळे व पोलीस स्टाफ यांचेवर रोखले त्यावेळी सपोनि कांबळे यांनी आरोपीस सरेंडर होणेबाबत व पिस्टल खाली ठेवण्याबाबत सांगितले. त्यावेळी आरोपीच्या पत्नीने आरडाओरड करुन सपोनि कांबळे यांना धक्काबुक्की केली. त्यादरम्यान आरोपी शाहरुख हा “तुम मुझे पकडते क्या, आज तुम्हाराच खेल खतम करता हूं, मैं तुमको जिंदा नही छोंडुगा” असे म्हणुन सपोनि कांबळे व पोलीस अंमलदारचे दिशेने फायर करु लागला. त्यावेळी आरोपीच्या घरातील पत्नीचा व मुलाचा तसेच पोलीसांच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याने आरोपीस पुन्हा पिस्टल खाली ठेवुन शरण येण्याचे अवाहन केले.
पंरतु तो ऐकत नसल्याने सपोनि कांबळे यांनी स्वतः चे व इतरांचे संरक्षणाकरीता त्यांचेकडील सर्व्हिस पिस्टलने त्याचे कमरेच्या खालच्या भागाच्या दिशेने फायर केला. पंरतु आरोपी हा आवेशाने फायर करत होता त्यामूळे सपोनि कांबळे यांनी पुन्हा फायर केले असता आरोपी जखमी होवुन खाली पडला. त्यावेळी सपोनि कांबळे व पोलीस स्टाफने आरोपीस सिव्हिल हॉस्पीटल सोलापूर येथे उपचारास दाखल केले व त्याचा उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला.
वरील घटनेबाबत सपोनि कांबळे यांनी दिले फिर्यादीवरुन मोहोळ पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण गुन्हा रजि. नं ६७५/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम १०९, १३२, ३ (५), ऑर्म अॅक्ट कलम ३(२५), महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये मयत आरोपी शाहरुख शेख व त्याचे पत्नी यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर मयत आरोपी शाहरुख शेख हा राहत असलेल्या घरझडतीमध्ये त्याने फायर केलेल्या गावठी बनावटीचे पिस्टल व त्यामध्ये ०४ जिवंत काडतुसे व्यतिरिक्त आणखी एक गावठी बनावटीचे पिस्टल व त्यात ०५ जिवंत काडतुसे व ०२ लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव