चोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपींचा थरारक पाठलाग करुन २ पिस्टल, ७ जिवंत काडतुस, घातक हत्यार व सोन्या चांदीच्या दागिण्यासह अटक
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी गुन्हे शाखा यांना विशेष आदेशीत केले आहे. त्याप्रमाणे पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद पवार यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व अंमलदार घरफोडीचे व चोरीचे गुन्हयांचा बारकाईने अभ्यास करुन संशयीत व सराईत आरोपींचा शोध घेत होते.
दिनांक २७/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पथक हद्दीत पेट्रालिंग करुन चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व पोहवा विक्रम कुदळ यांना त्यांचे गोपनिय आधारे माहीती मिळाली की, रावेत पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ५६९/२०२५ भा.न्या.सं कलम ३०५,३३१ (२) या गुन्हयातील संशयीत आरोपी हे हिंजवडी पोस्टे गुरनं ९६९/२०२५ या गुन्हयातील चोरी केलेल्या वाहनाने सोमाटणे टोलनाक्यावर येणार असले बाबत गोपनिय माहिती मिळाली. सदर ठिकाणी युनिट २ चे वपोनि श्री अरविंद पवार व त्यांची टिम सापळा रचुन थांबली असताना पहाटे ०५.३० वा चे सुमारास मिळालेल्या बातमी प्रमाणे एक राखाडी रंगाची मारुती सुझुकी कंपनीची सेलेरिओ कार क्रमांक एम ए १४ जे.ई २६२८ ही आली असता सदर कारला थांबवुन गाडीतील संशयित आरोपीतांना कार बाहेर येणेबाबत सांगितले असता सदर गाडीमधील आरोपी याने त्यांचे जवळील गावठी पिस्टलने वपोनि अरविंद पवार व स्टाफ यांना जिवे मारण्याचे उद्देशाने त्यांचे दिशेन राऊंड फायर केला असता गाडीचे उजव्या बाजुस असलेले पोहवा राठोड यांनी प्रसंगावधान राखुन सदर आरोपीचे हातातील पिस्टल हिसकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे सदर राउंड हे गाडीचे टपाला लागुन आरपार गेली. त्यावेळी शिताफिने पोलीस पथकाने ०३ आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) सनिसिंग पापासिंग दुधानी वय २४ वर्षे रा. गल्ली क्रं ५, श्री साई सोसायटी मागे, शिकलकर वस्ती, बिराजदार नगर, हडपसर पुणे २) जलसिंग राजपुतसिंग दुधानी, वय ३२ वर्ष रा सर्व्हे नं १० रामटेकडी, हडपसर, पुणे ३) मनिष बाबुलाल कुशवाह वय २८ वर्ष रा गाव पोस्ट कैलास, तहसील कैलास जि मुरायना राज्य मध्यप्रदेश असे असलेबाबत सांगितले. त्याचे गाडीची तपासणी केली असता त्यांचेकडे ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०७ जिवंत काडतुस चोरीच्या गुन्हयातील सोन्या चांदीचे दागिने, धारधार शस्त्रे असे वर्णनाचा एकुण ८,८७,०००/-किंमतीचा माल मिळुन आला.
सदर अटक केलेल्या आरोपी नामे १) सनिसिंग पापासिंग दुधानी वय २४ वर्ष रा पुणे याचेवर यापुर्वी विविध पोलीस स्टेशन येथे गंभीर प्रकारचे ७० गुन्हे दाखल असुन आरोपी नामे २) जलसिंग राजपुतसिंग दुधानी, वय ३२ वर्ष याचे वर एकुण ५० गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ शिवाजी पवार, मा. सहा पोलीस आयुक्त (गुन्हे १) डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रं २ चे वपोनि श्री अरविंद पवार, पोउपनि साळुंके, सपोफौ गवारे, पोहवा विक्रम कुदळ, पोहवा भाउसाहेब राठोड, पोहवा तुषार शेटे, पोहवा विक्रांत चव्हाण, पोहवा मोहंमद गौस नदाफ, पोहवा कृष्णा शितोळे, पोशि प्रशांत सैद, पोशि अमर राणे, पोशि सुखदेव गावंडे, पोशि धनंजय जाधव यांनी केली आहे..

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

