क्रिप्टोकरन्सीव्दारे पैश्याची हेराफेरी करणा-या ०३ आरोपीस सांगली, मुंबई व अहमदाबाद एअरपोर्ट या ठिकाणावरुन सायबर पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांच्याकडुन अटक.
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सायबर पोलीस स्टेशन गुरक्र ४२/२०२५ मधील फिर्यादी यांना आरोपी यांनी- 85 SC India stock circle या Telegram ग्रुपमधील अॅडमीन Lata Gupta @GGPPLU2, यांनी शेअर मार्केट ट्रेडींग साठी वेगवेगळ्या लिंक पाठवुन त्यामध्ये फिर्यादी यांना जास्तीत जास्त परतावा मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन फिर्यादी यांची एकुण २,१०,०४.७९४/-रुपयांची आर्थिक फसवणुक केली म्हणून फिर्यादी यांनी 85 SC India stock circle या Telegram ग्रुप मधील अॅडमिन Lata Gupta @GGPPLU2, @HINOCOCJB, @FUHJFIVJDY. Shirish Apte @HUJKISS धारक व्हॉट्सअप क्रमांक ७३३९५४४१८३ (SC-India Support) धारक व फिर्यादी यांनी पैसे पाठविलेल्या बैंक अंकाउट धारक, अॅप्लिकेशन धारक त्यांना मदत करणारे साथीदार यांचेविरुध्द कायदेशीर तक्रार दिल्याने सायबर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ४२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३ (५) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ सी, ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयाचे तपासदरम्यान आरोपी यांनी फिर्यादी यांची फसवणुक झालेल्या रकमेपैकी एकुण ७८,००,०००/- रुपये रक्कम सारस्वत बैंक अकाऊंट नंबर ६१००००००००५३९३८ यावर घेतले असल्याने सदर अकाउंटची माहीती प्राप्त केली असता ते पुनम रफिक शिकलगार रा. सांगली, महाराष्ट्र हिचे असल्याची माहीती प्राप्त झाल्याने प्राप्त माहीतीचे आधारे पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व पथक यांना रवाना करण्यात आले त्यांनी जि सांगील येथे जाऊन अकाऊंट धारक महीला पुनम शिकलगार हिचा शोध घेतला असता ती मिळुन आल्याने तीच्याकडे सारस्वत बैंक अकाउंट संदर्भात तपास केला असता सुरुवातीला तीने सदरचे बैंक अकाउंट तीचे नसल्याचे सांगीतले. त्यानंतर तीच्याकडे कसोशीने तपास केला असता सदरचे बैंक तीचेच असल्याचे सांगुन ते बैंक अकाऊंट तीचा मित्र नामे मोहम्मद सईद मोहम्मद पटेल रा. सांगली यास देऊन ते नाशिक येथे जाऊन चालविले असल्याचे सांगीतले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाव्दारे मोहम्मद सईद मोहम्मद पटेल याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचे बैंक अकाऊंट समर गुप्ता यास देऊन त्याच्याकडुन १२ लाख रुपये रोख स्वरुपात घेतले असल्याची कबुली दिली.
त्यानंतर समर गुप्ता याची त्याच्याकडुन माहीती घेतली असता समर गुप्ता हा व्हच्र्युअल नंबर वापरत असुन तो त्याचे राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत असल्याची माहीती मिळाली. परंतु प्राप्त मोबाईल नंबर हा व्हर्चुअल नंबर असल्याने त्याची माहीती मिळणे शक्य नव्हते. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी यांना समर गुप्ता हा मुंबई येथे येणार असल्याची माहीती प्राप्त झाली त्यानंतर आम्ही तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण व पथक यांना त्याचा शोध घेणेकरीता मुंबई येथे रवाना करण्यात आले. त्यांनी मुंबई येथे जाऊन त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याच्याकडे तपास केला असता त्याचे खरे नाव विशाल ठक्कर असल्याची माहीती मिळाली. तसेच त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचे बैंक अकाऊंट फॉच्र्युन यास देऊन त्या बदल्यात त्याच्याकडुन बायनन्सवर यु.एस.डी.टी ही क्रिप्टो करन्सी घेतली असल्याचे सांगीतले. तसेच त्याने फॉर्च्यून हा
भारतातील मुख्य आरोपी असल्याची माहीती दिली. त्यानंतर फॉर्च्यून याचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेतला असता तो वाराणसी वरुन विमानाने अहमदाबाद येथे येत असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व पथक यांना पाहीजे आरोपी फॉर्च्यून याचा शोध घेणेकरीता रवाना करण्यात आले होते. आरोपी फॉर्च्यून याने वाराणसी एअरपोर्टवरुन निघत असताना अटक आरोपी विशाल ठक्कर यास त्याचे लगेज (बेंग) चा फोटो पाठविला. त्या बॅगच्या फोटोवरून पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व तपास पथक यांनी आरोपी फॉर्च्यून याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता तो फॉर्च्यूनच असल्याची खात्री झाली त्यानंतर त्यास त्याचे मुळ नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नाव हर्ष मदोरीया रा. कानपुर असल्याचे सांगीतले. त्यानंतर त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हयात वापरलेल्या बैंक अकाऊंटला फिर्यादी यांचे व इतर वेगवेगळ्या नागरीकांचे पैसे घेतले असल्याचे सांगीतले. तसेच फिर्यादी यांचे ३९.६२,३१५/- रु बँकेला पत्रव्यवहार करुन होल्ड करण्यात आले आहेत.
सदर गुन्हयातील आरोपी नं १) मोहम्मद सईद मोहोद्दीन पटेल वय २५ वर्ष, व्यवसाय रा. सांगली. २) विशाल दिनेश ठक्कर ऊर्फ समर गुप्ता वय २८ वर्ष, व्यवसाय शेअर मार्केट ट्रेडींग, रा. लुईसवाडी, ठाणे ३) हर्ष सुरेंद्रप्रताप भदोरिया ऊर्फ फॉर्चुन ऊर्फ पुनित वय ३२ वर्षे, व्यवसाय बँक अकाऊंट सप्लायर रा. कानपुर, उत्तरप्रदेश– २०८०१२ यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीकडुन ०६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
अटक आरोपी यांनी पाहिजे आरोपी यांचे मदतीने आता पर्यंत संपूर्ण देशातील वेगवेगळया राज्यातील २६ नागरिंकाची करोडो रूपयाची फसवणुक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री रविकिरण नाळे पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त गुन्हे, डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि वैभव पाटील, पोउपनि सागर पोमण, पोउपनि रोहीत डोळस, पोउपनि प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक विदया पाटील, पोलीस अंमलदार, दिपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुरज शिंदे, अतुल लोखंडे, सोपान बोधवड, माधव आरोटे, संतोष सपकाळ, पंकज धोटे, सुरज जाधव, स्मिता पाटील, दिपाली चव्हाण, शिवाजी बनसोडे, स्वप्निल खणसे सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे. तसेच आरोपी विरोधात न्यायालयीन कामकाजाच्या वेळी सरकारी अभियोक्ता सुरत मोहीते यांनी मा. न्यायालयात बाजु मांडुन आरोपींची पोलीस कोठडी रिमांड मिळवून देण्यास मदत केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

