पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे येथे सी. ई. आय. आर. पोर्टल अंतर्गत हस्तगत केलेले १९३ मोबाईल तक्रारदार यांना केले परत


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
परिमंडळ-१ पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाइन पुणे :- पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ पुणे कार्यक्षेत्रातील खडक, समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, शिवाजीनगर व डेक्कन पोलीस ठाणेमध्ये तक्रारदार यांचे हरविलेले / गहाळ झालेले मोबाईल फोन तक्रारदार यांना परत करणेकरिता मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे शहर श्री. ऋषिकेश रावले, यांचे मार्गदर्शनाखाली दि. २७.११.२०२५ रोजी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह, नवीन इमारत, मार्डन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेला होता.
सदर कार्यक्रमाचे वेळी खडक पोलीस ठाणेकडील ४० मोबाईल, समर्थ पोलीस ठाणेकडील ५० मोबाईल, फरासखाना पोलीस ठाणेकडील १९ मोबाईल, डेक्कन पोलीस ठाणेकडील ४० मोबाईल, शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील ३० मोबाईल व विश्रामबाग पोलीस ठाणेकडील १४ मोबाईल असे एकुण १९३ मोबाईल हे सी. ई. आर. पोर्टलद्वारे महाराष्ट्रातुन तसेच बाहेर राज्यातुन हस्तगत करून उपस्थित तक्रारदार यांना त्यांचे मोबाईल फोन हे परत करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित तक्रारदार यांनी पुणे पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक करून त्यांचे मोबाईल हे परत केल्याबद्दल सर्व उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलवार यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रम हा मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार व मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे शहर श्री. ऋषिकेश रावले, यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला असून सदर कार्यक्रमाकरीता मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे शहर, श्रीमती अनुजा देशमाने मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर, श्री. साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पो.स्टे, श्री. उमेश गिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पो.स्टे श्री. शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोस्टे श्री. प्रदीप कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पो.स्टे, श्रीमती गिरीषा निंबाळकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरासखाना पो. स्टे श्री. उत्तम नामवाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजीनगर पो स्टे श्री. धनंजय पिंगळे तसेच इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!