हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व वाहतूक केंद्रावर धडक कारवाई.


पत्रकार :-  विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण 

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. अधीक्षक साहेब, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांचे आदेशानुसार दि. २१/०४/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त खात्रीलायक बातमीनुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे या विभागाने गुन्हा अन्वेषण विशेष मोहीम राबवून हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व वाहतूक केंद्रावर अचानक छापे घालून सदर कारवाई मध्ये रसायन २१०० लि., गावठी दारू ६४० लि., एक दुचाकी गाडी व इतर अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण रु. २,००,१००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत एक इसमास अटक करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांचा तपास निरीक्षक श्री. संजय कोल्हे, जी विभाग व श्री. ए. ए. औटे, दुय्यम निरीक्षक, जी विभाग, बीट क्र. १, पुणे हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त श्री. धोमकर साहेब व अधीक्षक श्री. राजपूत साहेब तसेच उपअधीक्षक, श्री. शिंदे साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. संजय के. कोल्हे व दुय्यम निरीक्षक श्री. ए. ए. औटे, यांनी केली आहे. सदर कारवाईत सर्वश्री सहा. दु. नि. श्री. मोडक आणि जवान श्री. संतोष गायकवाड, श्री. दत्तात्रय आबनावे यांनी सहभाग घेतला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!