दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची दमदार कामगिरी ! मोटर सायकल चोरी चे ०३ गुन्हे केले उघड….
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा कडील अधिकारी व अंमलदार हे हडपसर पो.स्टे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे, संदीप येळे, विनायक येवले यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की दोन इसम हे संशयीतरित्या ०२ दुचाकीसह गंगानगर स्मशानभूमी समोर हडपसर येथे थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी पथकाचे प्रमुख नंदकुमार गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले असता त्यांनी सदर बाबत कारवाई करणे कामी योग्य त्या सूचना दिल्याने सदर ठिकाणी स्टाफ च्या मदतीने सापळा रचून सदर संशयित इसमास अत्यंत पकडले व त्यास नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) सुरेश बाबुदास वैष्णव वय 27 वर्षे रा. कामठे वस्ती, हडपसर, पुणे 2) विधीसंघर्षित अशी सांगितले असून त्यांना चौकशीकामी ताब्यात घेऊन सदर दुचाकींबाबत विचारले असता त्यांनी हडपसर, व सिंहगड रोड परिसरातुन चोरल्याचे सांगितले , अधिक चौकशी मध्ये त्यांनी आणखी एक चोरी केलेली मोटार सायकल काढून दिली. त्याबाबत विमानतळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद आहे.
सदर आरोपींनकडुन खालील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत:-
१)हडपसर पो.स्टे.गु.र.नं.५४/२०२४ भा.दं.वि. कलम ३७९
२) विमानतळ पो.स्टे.गु.र.नं. १२/२०२४ भा.दं.वि.कलम ३७९
३) सिंहगड रोड पो.स्टे.गु.र.नं. ०९/२०२४भा.दं.वि.कलम ३७९
वरीप्रमाणे प्रमाणे वाहनचोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदर आरोपींना रिपोर्टने पुढील कायदेशीर कारवाई करणेकामी हडपसर पो.स्टे यांचे ताब्यात देण्यात आले
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही श्री रामनाथ पोकळे सो अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री.अमोल झेंडे सो पोलिस उपायुक्त गुन्हे , श्री. सतिश गोवेकर सो सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २,वपोनि नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सपोनि पाडवी ,पोलीस अंमलदार राजेश अभगे, अमोल सरतापे, संदीप येळे,विनायक येवले यांनी केली आहे

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

