अनेक वर्षा पासुन फसवणूकीच्या व चोरीच्या गुन्हयात फरार आरोपींना केले जेरबंद हरविलेली किमती मालमत्ता तक्रारदार यांना केली परत.
पंकेश जाधव संपादक 7020794626
शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयांमधील आरोपी हे वारंवार शोध घेवूनही मिळून येत नव्हते. आरोपी हे त्यांची अटक जाणूनबुजून टाळत असल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर सावंत यांचे निर्देशा प्रमाणे विशेष तपास पथक गठित करून दि.०१/०१/२०२५ पासुन ते आज पर्यंत सतत आरोपींचे तांत्रीक विश्लेषण करून व बातमीदार नेमूण आरोपींचा मागोवा घेतला. आरोपीतांना अटक करून क्लिष्ठ व गुतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच सायबर अर्जामधील तक्रारदार यांची हरविलेली मालमत्तेचा शोध घवून परत करण्यात यश मिळविले आहे. गठित पथकाने खालील प्रमाणे उल्लेखनिय कामगीरी केली आहे.
१. गु.र.नं. २३८/२०२४ भा.द.वि. कलम ४५७,३८० मधील आरोपी डेबज्योती करूणामय डे वय २८ वर्षे रा. खरागुण पश्चिमबंगाल यास त्वरीत अटक करून अरोपीने चोरी केलेले ७,२०,०००/- रुपये बैंक फ्रिज केले. तसेच गुन्हयात चोरी केलेला एक लाख रुपये किंमतीचा आयफोन मोबाईल जप्त केला.
२. गु.र.नं. १२७/२०२३ भा.द.वि. कलम ३९२ मधील आरोपी उसामा शफिक शेख वय २३ वर्षे रा. सैय्यद नगर हडपसर, पुणे यास तांत्रीक विश्लेषण करून अटक केली. नमुद आरोपीने फिर्यादी यांचा मोबाईल हीसकावून त्यामधून ४५ हजार रुपये काढून घेतले होते.
३. गु.र.नं. १२०/२०२३ भा.द.वि.कलम ४२०,४०६ मधील आरोपीने चांगला परताव देतो असे फिर्यादीस सांगून फिर्यादी कडून ३४ लाख प्राप्त केले होते. सदर गुन्हा घडल्या पासुन आरोपी हा फरार होता. गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करून नमुद आरोपीस अटक करण्यात आली.
४. गु.र.नं.१२२/२०२३ भा.द.वि. कलम ४२०,४०६ मधील फिर्यादी यांना चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून फिर्यादीस गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून पाच लाख रुपयांची फसवणूक केली. सदर गुन्हयातील आरोपी नामे आशिष रामदास मानकर वय ४८ रा. वाघोली, पुणे यास अटक करुन गुन्हा उघडकिस आणला.
५. शिवाजीनगर सायबर अर्ज क्र ११५/२०२४ मधील अर्जदार यांची वस्तू खरेदी करतांना पाच हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. सदर रक्कम फ्रिज करून अर्जदार यांना बँके कडून परत करण्यात आली आहे.
६. शिवाजीनगर सायबर अर्ज क्र ११६/२०२४ मधील अर्जदार यांची ऑनलाईल फसवणूक झाली होती त्याबाबत त्वरीत संबधित बँकांना पत्रव्यवहार करून अर्जदाराचे २८,०००/-रुपये परत मिळवून दिले.
७. शिवाजीनगर हद्दीमधील अर्जवरून हरविलेले मोबाईलचा तांत्रीक विश्लेषण करून एकून १० मोबाईल व ०१ लॅपटॉप असे अर्जदार यांना परत मिळवून दिले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि. १, पुणे श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहा पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे श्री. साईनाथ ठोंबरे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पो.स्टे. पुणे श्री. ांद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे नेतृत्वाखाली सहा पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, अर्जुन कुढाळकर, रुचिका जमदाडे यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

