चोरुन काढलेला व्हिडीओ, सोशल मिडीयावर व्हायरल करुन शरीर सुखाची आणि पैशाची मागणी करणा-या गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या
फैयाज शेख पुणे शहर प्रतिनिधी
वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वानवडी पो.स्टे. गुन्हा. रजि. नं. १५/२०२५ भा.न्या. सं. कलम ७७,७८,७९,३०८(२) अन्वये गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयाचे गांभीर्य पाहता तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक धनाजी टोणे यांनी तपासाची वेगाने सुत्र फिरून व पोलीस अंमलदार अमोल पिलाणे व अतुल गायकवाड, यांनी तांत्रिक विश्लेषण करुन सोशल मिडीयाबाबत माहिती घेतली.
माहितीच्या आधारे वानवडी पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार अमोल पिलाणे व गोपाळ मदने हे आरोपीचा माग काढत नाशिक येथे पोहचले. नाशिक येथुन आरोपी नामे कृष्णा संपत शिंदे, वय. २० वर्षे, धंदा केटरिंग, रा. चव्हाण मळा झोपडपट्टी, बिटको पोलीस चौकीच्या पाठीमागे, नाशिक रोड, नाशिक यास नाशिक पोलीसांचे मदतीने ताब्यात घेऊन त्यास अटक केली. नमुद आरोपीकडे तपास करता त्यास पैशाची गरज असल्यामुळे नमुद पिडीत महिलेचा खाजगीतील व्हिडीओ शुट करुन तो बनावट इन्स्टा आयडी तयार करुन व्हायरल केला आणि तो डिलीट करण्यासाठी पिडीतास ३०,०००/-रु. ची मागणी केली व ते न दिल्यास शरीर सुखाची मागणी केली. वगैरे निष्पन्न झाले. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक धनाजी टोणे हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्री. डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे, व वरीष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो.स्टे.श्री. सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वानवडी पो. स्टे. श्री. गोविंद जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, धनाजी टोणे, व पोलीस अंमलदार अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, गोपाळ मदने, सर्फराज देशमुख, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे व सुजाता फुलसुंदर या विशेष पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

