नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहास अध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकिय प्राधिकरण, मुबंई सन्मा. न्यायमुर्ती श्रीमती. मृदुला भाटकर यांची भेट
पंकेश जाधव संपादक 7020794626
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह,नाशिक
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे आज दि. २३/०८/२०२४ रोजी दुपारी २.३० वाजता सन्मा. न्यायमुर्ती श्रीमती. मृदुला भाटकर, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकिय प्रधिकरण, मुंबई, अध्यक्ष, भारतीय कायदा महाविदयालय, पुणे व कुमारी स्नेहा सप्रे, उपसंचालक भांडरकर प्राच्यविदया संशोधन संस्था, पुणे यांनी महाराष्ट्रातील कारागृहीन साहित्य वाड़ःमय या विषयावर संशोधन करणे करता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्त्योतर कालावधीत कारावास भोगलेल्या थोर साहित्यीक व स्वातंत्र्य सेनानी आचार्य विनोबा भावे, परम पुज्य साने गुरुजी, यांचे साहित्याची लेखनाची नोंद जाणुन घेणे करिता कारागृहात उपलब्ध जुने अभिलेख यांची माहिती संकलित करणे करता.मा. मुख्यालयाच्या परवानगीने कारागृहास भेट दिली.
कारागृह भेटी दरम्यान त्यांनी सानेगुरुजी कक्षास भेट दिली. व परम पुज्य साने गुरुजी कक्षातील प्रतिमेचे पुजन केले तसेच त्यावेळी सानेगुरुजी यांच्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील वास्तव्याबददल व कार्याविषयी तसेच श्यामची आई पुस्तक लेखना बददल माहिती जाणुन घेतली तसेच जुन्या अभिलेखांची पाहणी केली यादरम्यान सन १९३२ मधील कारागृहात दाखल नोंदीचे रजिस्टर पाहणी केले. तसेच महोदयांनी कारागृह भेटी दरम्यान कारागृहात चालविले जाणारे विविध उपक्रमा बददल जाणुन घेतले त्याप्रसंग्री कारागृहात चालविले जाणारे विविध नवनविन उपक्रम तसेच कारागृह निर्मित वस्तु, भाजीपाला बंदयांना दिली जाणारी विविध प्रकारचे प्रशिक्षण इ विषयी कारागृह अधीक्षक श्रीमती अरुणा मुगूटराव यांनी माहिती दिली मा. महोदयाचे भेटी दरम्यान कारागृहातील भजनी मंडळ यांनी संगिताच्या तालावर साने गुरुजी यांच्या कवितेचे गायन केले तसेच कारागृहातील चालविले जाणारे उपक्रम, प्रशिक्षण शिबीरे, बंदी भजनी मंडळ, रेडिओ केंद्र, कारागृहातील विविध वस्तुचे उत्पादन इ. उपक्रमांबददल कारागृह प्रशासनाची प्रशंसा केली.
सदर भेटीप्रसंगी कारागृह अधीक्षक श्रीमती अरुणा मुगूटराव, अति. अधीक्षक श्री. आर. आर. देशमुख, उप-अधीक्षक श्री. एस. व्ही. चिकणे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी श्री. एस. बी. खारतोडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

