नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहास १२९ वर्षीय योगगुरु पदमश्री पुरस्कार प्राप्त श्री. स्वामी शिवानंद बाबा यांची भेट.


पंकेश जाधव संपादक 7020794626

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे आज दि. २३/०८/२०२४ रोजी दुपारी २ वाजता योगगुरु पदमश्री श्री. स्वामी शिवानंद बाबा यांचे प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रथम श्री. शिवानंद बाबा यांचे तुळशीरोप देवुन कारागृह अधीक्षक श्रीमती मुगूटराव मॅडम यांनी स्वागत केले.

त्यानंतर शिवानंद बाबा यांचे शिष्या श्रीमती. डॉ. शर्मिला सिन्हा यांनी योगगुरु पदमश्री श्री. स्वामी शिवानंद बाबांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. योगगुरु श्री. स्वामी शिवानंद बाबा यांना सन २०२२ या वर्षी भारत सरकारने पदमश्री या नागरी पुरस्काराने सन्माणित करण्यात आले असून, त्यांनी बाबांचे वय १२९ वर्षे असुन ते अखंड ब्रम्हचारी होते, तसेच त्यांची जीवन पध्दती अत्यंत साधी-सरळा आहे. ते नित्यक्रमाने योग करीत असतात त्यांचा आहार हा शाकाहारी आहार घेतात, मसुरडाळ व भात याचे सेवन करतात. ते कृष्ठरोगी व भिकारी यांची सेवाकरण्याचे सामाजीक कार्य केले तसेच बंदी बांधवाना संबोधित करतांना योगगुरु श्री शिवानंद बाबा यांनी चांगल्या गोष्टीचे आचरण करणे, शाकाहार सेवन करणे, व दैनंदिन जीवन जगत असतांना नियमित योगा करणे बाबत उपदेश दिला व बंदीबांधवाना आशिर्वाद दिला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी कारागृह अधीक्षक श्रीमती अरुणा मुगूटराव, अति. अधीक्षक श्री. आर. आर. देशमुख, उप-अधीक्षक श्री. एस. व्ही. चिकणे, कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालय येथील स्वीय सहाय्यक श्री. कोष्टी प्रशासन अधिकारी श्री. पाटील, वरीष्ठ तुरुंगाधिकारी श्री. एस. बी. खारतोडे आणि शिक्षक श्री. पोतदार व श्री. म्हेत्रे आणि ४०० बंदी उपस्थित होते. उपस्थित बंदीबांधवानी १२९ वर्षीय श्री. शिवानंद बाबा यांना भेटल्याने आनंद व्दिगुणित झाला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!