अंधश्रध्देचा गैरफायदा घेवुन १३,२०,००,०००/- रु. ची आर्थिक फसवणुक करणारे तीन आरोपी अटकेत
प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०६/११/२०२५ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीत सन २०१८ ते दि.०४/११/२०२५ रोजी दरम्यान इसम नामे दिपक जनार्दन खडके रा. जय शंकर फार्म हाउस, वाडी वरे, नाशिक-मुंबई हायवे, नाशिक व त्यांची शिष्या/प्रतिनिधी व शंकर महाराज दरबारातील काम पाहणारी महिला नामे वेदिका कुणाल पंढरपूरकर, रा. प्लॉटनं. २२, कैलास दिप, लेननं. ११, महात्मा सोसायटी, कोथरुड, पुणे, मुळ पत्ता कृष्णकुंज निवास, प्लॉट नं. ५४, चाणक्य पुरी, नगर रोड, बीड व इसम नामे कुणाल वैजनाथ पंढरपूरकर, रा. सदर, वेदीकाची आई व भाऊ यांनी आपसात फौजदारी पात्र कट रचुन वेदीका हिचे अंगात शंकर महाराज येत असुन तिला दैवी शक्ती प्राप्त झाली आहे असे सांगुन प्लॉट नं. २२. कै लासदिप, लेननं. ११, महात्मा सोसायटी, कोथरुड, पुणे, या ठिकाणी दरबार भरवुन तेथे फिर्यादी त्यांचे आजारी मुलीसह गेले असता दैवी शक्तीव्दारे आजार बरे करु अशी बतावणी करुन फिर्यादी यांचे बँकेतील रक्क्कम, शेती, घर, प्लॉट, विमा पॉलीसी, पी. पी. एफ. रक्कम, इ.पी.एफ. रक्कम यामध्ये दोष असल्याचे सांगुन मनात भिती निर्माण करुन शेती व घर विकण्यास भाग पाडुन आलेली रक्क्कम, बँकेतील रक्कम, विमा पॉलीसी रक्कम, पी. पी. एफ. रक्कम, इ. पी. एफ. रक्कम, सोने तारण कर्ज रक्कम, गृहकर्ज रक्कम अशी सुमारे एकुण १३,२०,००,०००/-रु. वेदीका पंढरपुरकर, कुणाल पंढरपुरकर व पी. डी. बी/अन्वी कंपनी, सान्वी रेडीमिक्स कंपनीचे खात्यामध्ये जमा करण्यास भाग पाडुन फिर्यादी यांच्या मुली ब-या केल्या नाहीत व फिर्यादी यांनी आरोपी यांना दिलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणुक केली बाबत त्यांचे विरुध्द कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. ३०९/२०२५ भा.न्या.सं.क ३१८ (४), ३१६ (५), ६१ (२) सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादु अधिनियम २०१३ कलम ३ (२) सह अपंगत्व हक्क अधिनियम २०१६ कलम ९१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयात गुन्हे शाखा, युनिट १ चे पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांनी २ टिम तयार करुन तपासकामी नाशिक येथे रवाना झाल्या होत्या आरोपीचा नमुद पत्यावर शोध घेतला असता आरोपी मिळुन आले असुन सदर आरोपी यांना नाशिक ग्रामिण पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेतले आहे सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक, संतोष खेतमाळस, आर्थिक गुन्हे शाखा हे करीत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री.अमितेश कुमार, मा.सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर श्री. विवेक मासाळ, पो. उप-निरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, निलेश जाधव, म. पोलीस अंमलदार मयुरी जाधव यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

