खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीस चंदननगर पोलीसांनी सिने स्टाईल पाठलाग करून ठोकल्या बेडया
पंकेश जाधव संपादक 7020794626
चंदननगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- तक्रारदार नामे महेश रमेश वाजे, वय २८, पंदा व्यवसाय, रा. स.न.९, लेन नंबर १, तुकारामनगर, खराडी पुणे यांनी तक्रार दिले चरून चंदननगर पो.स्टे गुन्हा रजिस्टर नं.४९३/२०२३, भादवि कलम ३०७,४२७,४३५,३०८,१४३,१४७,१४८,१४९, १२० (ब), व क्रिमीनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट कलम ५,७ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे. सदर गुन्हयाचे अनुषंगाने यातील पाहिजे आरोपी धिरज दिलीप सपाटे, रा. लेन नंबर १, तुकारामनगर, खराडी पुणे याच्यावर गुन्हा दाखल झाले पासून फरार होता. चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयातील ०८ आरोपी हे २४ तासात अटक केले होते.
सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी धिरज सपाटे हा गुन्हा करून एका महिन्यापासुन फरार झाला होता. तो पिंपरी चिंचवड, कोंढ़या, बीड असे वेगवेगळे ठिकाणे बदलुन अटक चुकथित होता. पाहिजे आरोपी धिरज सपाटे याचा शोध घेत असताना, तपास पथकातील पोलीस हवालदार सचिन कुटे, पो. अंमलदार विकास कदम यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धिरज दिलीप सपाटे हा खोर रोड, ययत या ठिकाणी वावरत असल्याची खात्रिशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील टिम सदर बातमीची खात्री करुन सदर ठिकाणी रवाना होवुन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी धिरज सपाटे याला पोलीस स्टाफची चाहुल लागल्याने त्याने पोलीसांना पाहून खडकाळ भागात दगडावरुन उडया मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलीसांनी त्याचा सिने स्टाईलने पाठलाग करुन आरोपीस एक किलोमीटर अंतरावर पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्यानी त्याचे नाव धिरज दिलीप सपाटे, वय २५, रा. स.न.९, लेन नं.१, तुकाराम नगर, खराडी पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्यास पुढील कार्यवाहीकामी चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणून अटक केली आहे. पुढील तपास भगवान कांबळे, सहा पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर- श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. विजय मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग- श्री. संजय पाटील साो, यांचे मार्गदर्शनाखाली मा. मनीषा पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक साो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, तपास पथक प्रभारी अधिकारी पो.उप. निरीक्षक तान्हाजी शेगर, पोलीस अंमलदार सचिन कुटे, अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोने, महेश नाणेकर, सचिन रणदिवे शिवाजी धांडे, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकात कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाणे, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

