पुणे लोहमार्ग पोलीस आणि फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान संस्थेमार्फत लैंगिक अत्याचार विरोधी जनजागृती…
संपादक :- पंकेश जाधव 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे अत्याचार थांबावेत, मुलांना बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय ते कसे केले जातात व त्यावेळी मुलांनी काय करावे हे समजण्यासाठी पथनाट्य च्या माध्यमातून पुणेलोहमार्ग पोलीस व मुस्कान संस्थेच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन वरती पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी बालकांना त्यांचे अधिकार दिले पाहिजे हे अधिकार देण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे म्हंटले.
पोलीस निरीक्षक दिपाली आढाव यांनी बाल लैंगिक अत्याचार घटना घडत असल्यास न घाबरता याची माहिती संबंधित पोलीस स्टेशन मध्ये देण्याचे आवाहन केले. मुस्कान संस्थेच्या प्रमोद पाटील यांनी पालकांनी आपल्या मुलांना खाजगी अवयव बाबत त्यांच्याशी बोलण्याचे व असे अत्याचार झाल्यानंतर त्याची माहिती मुस्कान संस्थेला देण्याचे आवाहन केले. सदरचे पथनाट्य मुस्कान संस्थेच्या पूजा कडू, धनश्री मोरे, रानी लोखंडे, निशा कुलकर्णी व प्रमोद पाटील यांनी सादर केले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

