कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गोळीबार…
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळयांपैकी १ गोळी शरद मोहोळ याला लागल्याची प्राथमिक माहिती असून मोहोळ याला सह्याद्री रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.
शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ याच्याविरूध्द अनेक गंभीर गुन्हयांची नोंद पुण्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात आहे. दरम्यान, काही गुन्हयांमध्ये न्यायालयाने मोहोळ याची निर्दोष मुक्तता देखील केली आहे.
अलिकडील काळात शरद मोहोळने अनेक सामाजिक कार्यक्रम देखील घेतले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अचानकपणे मोहोळवर गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमी झालेल्या मोहोळला सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम करीत असून हल्लेखोरांबाबत माहिती मिळवत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

