रमजान ईद सण उत्सव निमित्ताने तसेच कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतूक समस्या इतर अडचणी यांच्यावर चर्चा…
संपादक :- पंकेश जाधव 7020794626
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 22/ 2 /24 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील कोंढवा खुर्द या ठिकाणी पोलीस स्टेशन हद्दीतील आगामी येणारे रमजान ईद सण उत्सव निमित्ताने तसेच कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतूक समस्या तसेच इतर अडचणी यांच्यावर चर्चा करण्याकरिता मीटिंगच्या आयोजन करण्यात आली होती. सदर मीटिंग करीता माननीय अपर पोलीस आयुक्त श्री.मनोज पाटील यांचे मार्गदर्शन खाली आयोजीत करण्यात आली होती. सदर वेळी माननीय पोलीस उप – आयुक्त सो. श्री आर राजा , श्री. इंगळे सहा.पोलीस आयुक्त सो वानवडी विभाग असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माननीय वरिष्ठांकडून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदर मीटिंगमध्ये अल्पसंख्यांक समिती पुणे शहर अध्यक्ष श्री समीर अन्सार शेख , शांतता कमिटी सदस्य श्री अबिद सय्यद, महाराष्ट्र ॲक्शन कमिटी अध्यक्ष श्री. जाहीद भाई शेख , माजी नगर सेवक श्री गफुर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ), श्री हाजी फिरोज शेख, श्रीमती हसीना इनामदार , मौलाना श्री.कारि इद्रिस, मौलाना श्री अन्वर सुफी साहेब, माजी आमदार महादेव बाबर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), व ईतर १२० ते १२५ मस्जिद मदरसा ट्रस्टी ,सदस्य तसेच पुणे महानगर पालिका पाणी पुरवठा विभाग अधिकारी, एम एस सी बी कार्यालय अधिकारी व कर्मचारी, पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग अधिकारी कोंडा वाहतूक विभागाकडील अधिकारी असे हजर होते सगळे वाहतूक विषयी होणाऱ्या अडचणींवर उपयोजना करणे बाबतची चर्चा करण्यात आली तसेच
खालील प्रमाणे मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या .
१) रमजान ईद निमित्त उभारण्यात येणारे खाद्यपदार्थ स्टॉल हे मनपा कडील , वाहतूक विभागाकडील, तसेच संबंधित इतर विभागांकडे परवानगी घेऊन उभारण्यात यावे
२)वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने कोणतेही स्टॉल उभारण्यात येऊ नये .
३)स्टॉल उभारल्यानंतर सदर स्टॉलचे पार्किंग हे आवश्यक आहे सदर बाबत कोंढवा दक्षता घेण्यात यावी असे सूचना देण्यात आल्या.
४) नमाज चे वेळी पार्किंग व्यवस्था योग्यरीत्या करण्यात यावी तसेच सदर वेळे मस्जिद कमिटीकडील स्वयंसेवक नेमण्यात यावेत
५) आक्षेपार्ह धार्मिक तेढ निर्माण होईल असे बॅनर लावू नयेत तसेच संवेदनशिल प्रकार आढळून आल्यास तात्काळ कोंढवा पोलीस स्टेशन अथवा डायल 112 वर कळवावे व कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस प्रशासनास मदत करावी असे आवाहन करण्यात आले.
सदर मीटिंग १६/२० वाजता सुरू होऊन १७/४५ वाजता शांततेत पार पडली..

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

